AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

Maharashtra Weather Update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. पावसाला सुरूवात देखील झाली. वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 19, 2026 | 7:37 AM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. रखडलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट बघितली जात आहे. त्यातच आता पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकाडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावले. नाशिक, घाटमाथा पुणे, सातारा याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोदिंया, वाशिम, नागपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला.

अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, बीड, पुणे, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला. सकाळपासून ढगाळ वातावरण असून रात्री अनेक भागात पाऊस झाला. वाशिमच्या मालेगाव आणि मंगरूळपीर कारंजा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर जिल्ह्यातील काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांच्या वाढीस मोठी मदत होणार आहे. ज्यामुळे शेतकरी राजांची चिंता मिटली आहे.

परभणीत दहा दिवसाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर पावसाला सुरूवात झाली. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानंतर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांवरील तूर्तास दुबार पेरणीच संकट टळल आहे. 20 जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्येच आता पावसाला सुरूवात झाली. ज्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळणार असल्याचे स्पष्ट आहे. पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...