AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात..

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात आज काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 17, 2026 | 7:17 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. काल राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. बिहार समु्द्रसपाटीपासून 1.5 किलो मीटर उंचीवर तसेच गुजरात आणि परिसरात 3.1 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. नांदेड, लातूर, धाराशिव, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये उकाडा कायम राहिल. 20 जुलैनंतर राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आज अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. आजही पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे. काल मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. रात्रीही काही जिल्ह्यात पावसाची नोंद झाली.

यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. पावसाअभावी शेतात टाकलेले पऱ्हे धान पीक नर्सरी करपण्याच्या मार्गावर आहेत.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज आहे. मात्र, शेतकरी राजा चिंतेत असल्याचे बघायला मिळतंय. जर पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात कोसळला नाही तर दुबार पेरणीचे मोठे संकट हे शेतकऱ्यांवर असणार आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिली असताना, जुलैच्या पंधरवड्यातही राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही.

मध्य महाराष्ट्रातील काही भागात, तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात जुलैमधील सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली असून तेथे पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे निम्मा महाराष्ट्र दुष्काळसदृश स्थितीच्या सावटाखाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. बहुतांश भागात 20 ते 60 टक्क्यांदरम्यान पावसाची तूट असल्याचे दिसत आहे. सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज असला तरीही सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे. मोसमी पावसाला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक