AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?

राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?

| Updated on: Jul 16, 2026 | 6:56 PM
Share

राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांमध्ये वाढ झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीतील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दीड महिन्यांत केंद्र आणि राज्य पातळीवर महत्त्वाचे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या दिल्ली भेटींचा संबंध या संभाव्य बदलांशी जोडला जात आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशा चर्चांनीही वेग घेतला आहे. मात्र, याबाबत फडणवीस यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाराष्ट्रासोबतच झारखंड, मध्यप्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील मख्यमंत्री पदांबाबत आगामी काळात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 16, 2026 06:56 PM

Follow Us