AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान

Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान

| Edited By: | Updated on: Jul 16, 2026 | 5:12 PM
Share

श्री विठ्ठलाच्या चरणांची झीज होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका अज्ञात भाविकाने मंदिर समितीकडे तब्बल अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका दान दिल्या आहेत. या सोन्याच्या पादुकांची किंमत सुमारे 56 लाख 59 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

अहिल्यानगर येथील एका भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे सोन्याच्या भरीव पादुका अर्पण केल्या. श्री विठ्ठलाच्या चरणांची झीज होत असल्याने आणि चरणांवरील वज्रलेप प्रक्रियेला वेळ लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे दान करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मंदिर समितीच्या माहितीनुसार, या सोन्याच्या पादुकांचे वजन सुमारे अर्धा किलो असून त्यांची अंदाजे किंमत 56 लाख 59 हजार रुपये आहे. या पादुका श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना विशेष अलंकार करण्यात येणाऱ्या दिवशी परिधान करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

दरम्यान, या अनमोल दानाची भाविकांमध्ये मोठी चर्चा सुरू असून, श्री विठ्ठलावरील श्रद्धेचे हे अनोखे उदाहरण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मंदिर समितीनेही भाविकाच्या या दानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, धार्मिक परंपरा जपत या पादुकांचा नियमानुसार वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Published on: Jul 16, 2026 05:08 PM

Follow Us