AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, 2nd ODI: विराट कोहलीने पाचव्या चेंडूवर चौकार मारत रचला विक्रम, काय केलं ते वाचा

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली काही खास करू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या वनडेत काय करतो? याकडे लक्ष लागून होतं. या सामन्यात त्याने पाचव्या चेंडूवर चौकार मारला आणि एक मोठा विक्रम नावावर केला.

IND vs ENG, 2nd ODI: विराट कोहलीने पाचव्या चेंडूवर चौकार मारत रचला विक्रम, काय केलं ते वाचा
IND vs ENG, 2nd ODI: विराट कोहलीने पाचव्या चेंडूवर चौकार मारत रचला विक्रम, काय केलं ते वाचाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 16, 2026 | 6:36 PM
Share

भारत इंग्लंड दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. तसेच 12 वर्षांपूर्वी कार्डिफच्या सोफिया गार्डन्स स्टेडियममध्ये उतरला होता. तेव्हा त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. पण यावेळी विराट कोहलीने सावध फलंदाजीचा पवित्रा घेतला. मैदानात उतरल्यानंतर पहिले चार चेंडू त्याने निर्धाव घालवले आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारत खातं खोललं. त्यामुळे 12 वर्षापूर्वीचा डाग पुसून काढला आहे. तसेच पहिल्याच चौकारावर एक मोठा विक्रम नावावर केला आहे. या चौकारासह विराट कोहलीने इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. खरं तर त्याच्याकडे पहिल्याच सामन्यात ही कामगिरी करण्याची संधी होती. पण त्याला फक्त 5 धावा करता आल्या होत्या. मात्र या सामन्यात त्याने चौकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

विराट कोहलीने माजी कर्णधार राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे. कारण इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. आता हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. राहुल द्रविडने इंग्लंडमध्ये तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 56 डावात फलंदाजी केली आणि 2645 धावा केल्या. यात त्याने 8 शतकं ठोकली होती. तसेच त्याची सरासरीने 55 ची होती. आता विराट कोहलीने 75 डाव खेळले असून 40हून अधिकच्या सरासरीने 2645च्या पार धावा केल्या आहेत. पण विराट कोहलीने इंग्लंडमध्ये फक्त तीन शतकं ठोकली आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 56 डावात 2626 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीचं शतक!

भारत इंग्लंड सामन्याच्या नाणेफेकीनंतर विराट कोहलीचं नाव प्लेइंग 11 मध्ये झळकलं आणि त्याच्या नावावर एक शतक झळकावलं गेलं. हे धावांचं शतक नाही, तर सामन्यांचं विशेष शतक आहे. विराट कोहली ने SENA देशात (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 100 वनडे सामने खेळण्याचा मान मिळवला आहे. इंग्लंडमध्ये विराट कोहलीचा हा 35वा वनडे सामना आहे. आता या सामन्यात धावांचं शतक ठोकतो की नाही? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Follow Us
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा