AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला..

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. इंग्लंडसाठी करो या मरोची, तर भारतासाठी मालिका विजयाची संधी आहे.

IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला..
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 16, 2026 | 5:18 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना कार्डिफच्या सोफिया गार्डन मैदानात होत आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. कर्णधार शुबमन गिल फिट अँड फाईन असल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. कारण पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडून रिटायर्ड हर्ट झाला होता. तसेच दुसऱ्या सामन्यात कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवली जाण्याची चर्चा होती. पण शुबमन गिल या सामन्यात खेळत असल्याने क्रीडाप्रेमींनी सुटकेचा श्वास सोडला.  दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला. कर्णधार हॅरी ब्रूकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हॅरी ब्रूक म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. गवत छान आणि एकसारखे पसरले आहे. खेळ थोडा अधिक चांगला झाला असता, चेंडू खोलवर नेण्याचा प्रयत्न उत्तम होता. आम्ही दोन बदल केले आहेत.’

काय म्हणाला कर्णधार शुबमन गिल?

टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. कामगिरी चांगली होत आहे आणि खूप आनंद आहे. आम्ही एक परिपूर्ण सामना खेळलो, आशा आहे की आज पुन्हा तशीच कामगिरी करू. आम्ही चांगली सुरुवात केली आणि वेगवान गोलंदाजांना चांगली कामगिरी करताना पाहून खूप आनंद झाला. येथील खूप चांगल्या आठवणी आहेत. आमच्या संघात एक बदल आहे, केएल आजारी आहे आणि त्याच्या जागी इशान आला आहे .’ आता या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली कशी कामगिरी करतात? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मागच्या सामन्यात हे दोघंही फेल गेले होते.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

Follow Us
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा