AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटलांची तपासणी; प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी काय सांगितलं?

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटलांची तपासणी; प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी काय सांगितलं?
manoj jarangeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 9:51 PM
Share

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. हे निर्णायक उपोषण असेल, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता आंतरवाली सराटीमध्ये उपोषणस्थळी जाऊन वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र आता बीपी आणि शुगर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान त्यानंतर आता सरकार दरबारी हालचालींना वेग आला असून, उद्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे. आंतरवाली सराटीमध्ये जाऊन उद्या हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. दरम्यान या चर्चेमध्ये या आंदोलनावर काही तोडगा निघणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईत आंदोलनाचा इशारा

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सरकारला मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला 15 दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर बारा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मराठा बांधवाची बैठक बोलवणार आणि या बैठकीमध्ये मुंबईतील आंदोलनाची घोषणा करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला असून, राज्यातून मराठा बांधव आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. उद्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

Follow Us
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?