AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dubai Salary : दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही…आकडा वाचून चकित व्हाल!

उत्तराखंडचे बलविंदर सिंग हे क्रेन ऑपरेटर म्हणून दुबईत काम करतात. त्यांनी 2005 साली या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज ते दुबईमध्ये या कामातून चांगली कमाई करत आहेत. दुबईच्या गगनचुंबी इमारती आणि मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये उंचच उंच क्रेन सहज पाहायला मिळतात.

Dubai Salary : दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही...आकडा वाचून चकित व्हाल!
dubai crane operatorImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 9:21 PM
Share

Dubai Salary : परदेशात जाऊन चांगली कमाई करण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र, त्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी मेहनत आणि संयमही तितकाच महत्त्वाचा असतो. दुबई हे असं ठिकाण आहे, जिथं कामाला गेल्यावर भरगच्च पगार मिळतो, असं नेहमी म्हटलं जातं. याच पगाराच्या आकर्षणामुळे तसेच आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने अनेक तरूण दुबाईत जाऊन काम करतात. आता दुबईत क्रेन ऑपरेटिंगचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला दुबाईत तब्बल सव्वा लाख रुपयांच्या घरात पगार मिळतो, असं समोर आलं आहे.

क्रेनसारखी अवाढव्य मशीन चालवण्यासाठी…

उत्तराखंडचे बलविंदर सिंग हे क्रेन ऑपरेटर म्हणून दुबईत काम करतात. त्यांनी 2005 साली या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज ते दुबईमध्ये या कामातून चांगली कमाई करत आहेत. दुबईच्या गगनचुंबी इमारती आणि मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये उंचच उंच क्रेन सहज पाहायला मिळतात. मात्र, क्रेनसारखी अवाढव्य मशीन चालवण्यासाठी मोठं कौशल्य आणि जबाबदारी लागते. बलविंदर सिंग गेल्या दोन दशकांहून अधिक काळ क्रेन चालवत आहेत.

व्हिडिओमध्ये बलविंदर सिंग यांनी…

कंटेंट क्रिएटर जगदीश चावला यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बलविंदर सिंग यांच्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये बलविंदर सिंग यांनी दुबईतील काम, पगार आणि क्रेन ऑपरेटर म्हणून आलेले अनुभव सांगितले.

क्रेन ऑपरेटरला किती पगार मिळतो?

बलविंदर यांच्या म्हणण्यानुसार, दुबईमध्ये क्रेन ऑपरेटरची कमाई कामाच्या स्वरूपानुसार आणि अनुभवावर अवलंबून असते. काही परिस्थितींमध्ये महिन्याला सुमारे 4000 ते 4500 ऑस्ट्रेलियन डॉलर, म्हणजे भारतीय चलनानुसार साधारण 1 ते 1.7 लाख रुपये कमाई होऊ शकते. मात्र, क्रेन ऑपरेटरचा हा ठरलेला पगार नाही. पगार ठरवताना अनुभव, कंपनी, क्रेनचा प्रकार, कामाचे तास आणि नोकरीच्या अटी यांसारख्या अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. बलविंदर यांना 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. म्हणूनच त्यांना एवढा पगार मिळतो.

कोणता कोर्स करावा लागतो?

दरम्यान, Indeed च्या दुबईतील वेतनाच्या आकडेवारीनुसार, 13 ऑगस्ट 2026 रोजी क्रेन ऑपरेटरचा बेसिक पगार सुमारे 3044 AED प्रति महिना आहे. दुबईत क्रेन ऑपरेटर होण्यासाठी एखादा विशिष्ट कोर्स आवश्यक आहे का, असा प्रश्न बलविंदर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी विशेष कोर्सची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. मात्र, क्रेन चालवण्यासाठी वैध परवाना असणं आवश्यक आहे. परवाना मिळवण्यासाठी सुमारे 6000 ते 700 AED खर्च येऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा