AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद

Sadabhau Khot : रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो... महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
Sadabhau Khot RayatImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 30, 2026 | 8:56 PM
Share

मंत्रीपद न मिळाल्याची खदखद व्यक्त करत विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सत्तेतील राजकीय समीकरणांवर भाष्य केले आहे. रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना खोत यांनी नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक करत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचेही समर्थन केले. सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

बाहेरून सरदार आले आणि मंत्री झाले

सदाभाऊ खोत यांनी, ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस तळागाळातून वर येतो आणि दीडशे आमदारांचा नेता होतो. आम्ही पण तुमचेच आहोत. पण वाड्यातले सरदार फडणवीसांच्या पायाला जाऊन मिठी मारतात. पडळकर साहेब, हे सरदार आले आणि साहेबांच्या पायाला लागले. ते मंत्री झाले आणि आपण फक्त बघत बसलो. आपल्यावर काय वाईट वेळ आलीय’, अशी खदखद खोत यांनी व्यक्त केली.

फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक

त्याचवेळी सदाभाऊ खोत यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ‘आपला विस्थापित व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि प्रस्थापित त्याच्यासमोर लोटांगण घालू लागले, हा खरा आमचा विजय आहे, असेही म्हटले. यावेळी खोत यांनी सरकारकडे काही नेत्यांच्या कथित कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. ‘मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. हे गडी आत घ्या, यांना तेल लावून चांगलं मालिश करा. त्यांनी बँका, सूतगिरण्या, साखर कारखाने कसे खाल्ले याचा रिपोर्ट करा. या सर्व प्रस्थापितांनी गावगाडा उध्वस्त केला, असे खोत म्हणाले.

बँकेच्या संचालकपदावरूनही त्यांनी टोला लगावला. ‘आमदाराला बँकेत संचालक व्हावं वाटतं, कारण त्यांना माहिती आहे की बँक ही अलीबाबाची गुहा आहे. त्या गुहेत गेलं की पोतं घेऊनच बाहेर पडायचं, हे त्यांना माहिती आहे.’ असे विधान खोत यांनी केलं.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे समर्थन

सदाभाऊ खोत यांनी यावेळी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे समर्थन करत विरोधकांवरही निशाणा साधला. जर इथेनॉलमुळे गाड्या बंद पडल्या असत्या, तर मुंबईत निम्म्या गाड्या बंद पडल्या असत्या. भारताच्या तुलनेत परदेशात अधिक प्रमाणात इथेनॉल मिश्रण केले जात असल्याचा दावा करत खोत म्हणाले की, ‘परदेशात 30 टक्के इथेनॉल मिक्स करतात, आपण 20 टक्के करतो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचणार आहे.’

Follow Us
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर