AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा, भावूक पोस्ट करत म्हणाल्या की, मी मुर्ख होते विचार करायचे की…

UP IAS Resignation News: उत्तर प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर या प्रकरणात ईमानदार अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे.

IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा, भावूक पोस्ट करत म्हणाल्या की, मी मुर्ख होते विचार करायचे की...
IAS Divya Mittal's resignation
| Updated on: Aug 30, 2026 | 9:16 PM
Share

उत्तर प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) पदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अलिकडे आयएएस अधिकाऱ्यांचे राजीनामा देऊन दुसरे क्षेत्र निवडण्याचे प्रमाण वाढले आहे. युपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेसाठी देशभरातून हजारो विद्यार्थी दहा ते बारा तास अभ्यास करुन उत्तीर्ण होतात. त्यानंतर त्यांना मोठा पगार, रुबाब आणि सरकारी गाडी आणि बंगला नोकरचाकर मिळत असतो. मात्र, आयएएस दिव्या मित्तल यांच्या अचानक राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी आणि देवरिया जिल्हा मॅजिस्ट्रेट असलेल्या दिव्या मित्तल यांनी आयएएस सेवेतून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांची १३ वर्षांची प्रशासकीय सेवा समाप्त झाली आहे. साल २०१३ च्या बॅचच्या आयएएस असलेल्या मित्तल यांनी त्यांच्या राजीनाम्या मागची भूमिका एक्सवर पोस्ट करुन मांडली आहे.

दिव्या मित्तल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आज मी १३ वर्षांचा अविस्मरणीय प्रवासाला आपल्या इच्छेने विराम देत आयएएस पदाचा राजीनामा देत आहे. साधारण कुटुंबातून येऊन एक चांगले, यशस्वी जीवनाचे स्वप्न मी पाहिले होते. दिवसरात्र एक करुन IIT दिल्ली आणि IIM बंगलोर येथून शिक्षण घेतल्यानंतर मला लंडन येथे नोकरी लागली. मात्र, सर्व काही मिळवल्यानंतरही काही अपूर्ण होते. आपल्या देशा नसणे मला त्रास देत होते. माझा शिक्षण, आत्मविश्वास , जगात कुठेही मानवर करुन चालण्याची ताकद, सर्व काही या मातीचे माझ्यावर कर्ज होते. ते कर्ज चुकवायचे होते. ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते. त्याला उभारणाऱ्या विटांवर माझ्या हाताच्या खूणा असाव्यात अशी माझी इच्छा होती. म्हणून परत देशात आले आणि आयएएस अधिकारी बनण्याचे सौभाग्य मिळाले.

“मी मुर्ख होते जो विचार करत होते की काही देण्यासाठी आपण आलो आहोत. मात्र सत्य हे आहे की सर्वात जास्त मला मिळाले आहे. ते कर्ज आणखीन वाढत राहिले. खूप काही शिकण्याची संधी मिळाली आणि खूप काही शिकले. देवरियाने शिकवले की खऱ्या सोबत उभे राहणे पर्याय नाही कर्तव्य आहे. मिर्झापूरने शिकवले की असंभव कोणते तथ्य नाही केवळ एक सल्ला आहे. आई विंध्यवासिनीच्या चरणात बसून शिकले की शक्ती कोणत्या पदाने नव्हे तर त्यांची कृपा आणि लोकांच्या विश्वासाने येते.”

माझ्या आनंदात मला जेवढा आनंद झाला, त्यापेक्षा अधिक आनंद लोकांना झाला. मी थकलेली आणि खचलेली असतानाही ते माझ्याकडे त्याच आत्मविश्वासाने पाहत होते. आणि यामुळेच मला पुढे जात राहण्याचे धैर्य मिळाले. मला इतके प्रेम, इतका आदर, इतकी आपुलकी मिळाली की माझे मन काठोकाठ भरून आले. आणि याचे मोठे श्रेय माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आणि माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जाते असेही त्यांनी पोस्ट करताना म्हटले आहे.

पहिल्या प्रयत्नात त्यांची IPS साठी निवड

मुळच्या हरियाणाच्या रेवाडीच्या राहणाऱ्या मित्तल याच्याकडे IIT दिल्लीचे BTech ची डिग्री आणि IIM बंगलोरवरुन MBA ची डिग्री मिळवली आहे. एमबीए केल्यानंतर त्या लंडनला नोकरीला गेल्या. त्यानंतर त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात २०१३ मध्ये सिव्हील परीक्षा उत्तीर्ण केली आणि ६८ वी रँक मिळवली आणि आयएएसमध्ये सामील झाल्या. २०१२ मध्ये पहिल्या प्रयत्नात त्यांची IPS साठी निवड झाली होती.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...