AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात तीन चुका अशा असतात त्या चुकांना आयुष्यात कधीही माफी मिळत नाही.

Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 8:39 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. माणसाने आयुष्यात काय करावं आणि काय करू नये? नातेसंबंध कसे असावेत, पतीची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? आई वडिलांनी आपल्या मुलांवर संस्कार कसे करावेत? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशा काही चुका असतात ज्या चुका आयुष्यात कधीही करता कामा नये, भलेही तुम्ही दुसरी एखादी चूक केली तर ती सुधारण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. परंतु या तीन चुका अशा आहेत, त्या जर तुम्ही केल्या तर आयुष्यात तुम्हाला कधीही पुन्हा चूक सुधारण्याची संधी मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिक्षण – चाणक्य म्हणतात शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे, ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती व्हाल, तुम्हाला रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला रोजगाराच्या संधी मिळाल्या तर तुमच्याकडे पैसा देखील असेल, तुम्ही तुमचं आयुष्य सुखात जगू शकाल. परंतु तुमच्याकडे जर चांगलं शिक्षण नसेल तर आयुष्यभर कष्ट करण्याची वेळ तुमच्यावर येईल. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे, ती योग्य वेळेतच पूर्ण करता येते. एकदा वेळ निघून गेल्यानंतर आयुष्यात पुन्हा कधी शिक्षणाची संधी मिळत नाही. त्यामुळे अडाणी राहण्याची चूक कधीही करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

अंधळेपणाने विश्वास – चाणक्य म्हणतात आयुष्यात कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका, तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार आहात, त्या व्यक्तीला आधी प्रत्येक कसोटीवर पारखून घ्या, आणि मगच त्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवला तर तो व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकतो. त्यामुळे तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. तुम्हाला सुधारण्याची दुसरी संधी देखील मिळत नाही, असं चाणक्य म्हणतात.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर तुम्ही कुठे आहात? हे तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात यावरून ठरतं. जर तुम्ही वाईट माणसांच्या संगतीमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात, आणि जर तुम्ही योग्य व्यक्तीच्या संगतीमध्ये असाल तर मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी होतात, त्यामुळे प्रत्येकाने वाईट संगत टाळली पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा