AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाळ अन् धूर सोबतच; चीन, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मित्र भारतासाठी रशियाचा सर्वात मोठा निर्णय

चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. रशियाने पुन्हा एकदा भारतासोबतची आपली मैत्री किती खास आहे, हे दाखवून दिलं आहे. रशियाने मोठी घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत.

जाळ अन् धूर सोबतच; चीन, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मित्र भारतासाठी रशियाचा सर्वात मोठा निर्णय
Vladimir PutinImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 9:17 PM
Share

चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. रशियाने पुन्हा एकदा भारतासोबतची आपली मैत्री किती पक्की आणि जुनी आहे, याचा प्रत्यय दिला आहे. रशियाने भारताला एस S400 सुदर्शन वायू रक्षा प्रणालीचे आणखी पाच स्क्वाड्रन देण्याचा मोठा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव 50000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी विमानांना यशस्वीपणे रोखणाऱ्या या यंत्रणेचे अतिरिक्त युनिट पूर्व आणि पश्चिम आघाडीवर तैनात करण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर सध्या विचार सुरू आहे. भारताने या यंत्रणेसाठी दाखल केलेल्या निविदावर रशियाकडून उत्तर आलं असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

भारताने 2018 पूर्वी ऑर्डर केलेले पाच एस -400 स्क्वाड्रोन पैकी चार भारताला यापूर्वीच मिळाले आहेत. तर आणखी एक स्क्वाड्रनची डिलिव्हरी या वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नव्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील तीन वर्षानंतर त्याची डिलव्हरी सुरू होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, यामध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने लगेचच एस S400 सुदर्शन वायू रक्षा प्रणालीचे आणखी पाच स्क्वाड्रन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता अंतिम स्वरुप प्राप्त होण्याची शक्यता आहे. सर्व गोष्टी योग्य झाल्या तर पुढील तीन वर्षानंतर भारताला त्याची डिलव्हरी मिळू शकते.

दरम्यान भारताला संकट काळात रशियाने वेळोवेळी मदत केली आहे. रशिया भारताला स्वस्तात कच्च्या तेलाचा पुरवठा करत होता. ऊर्जेच्या गरजेसाठी भारत मोठ्या प्रमाणात रशियावर अवलंबू आहे. मात्र अमेरिका आणि इराण युद्ध सुरू झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झालं. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यानंतर रशियाने भारताला जी कच्च्या तेलात सवलत दिली होती, ती बंद केली. भारताला रशियाकडून अधिक दराने कच्च्या तेलाची खरेदी करावी लागली. मात्र तरी देखील रशियाने पुरवठा मात्र सुरळीत ठेवला होता.

Follow Us
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम