AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने पार पडले. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आणि विजय मिळवला. यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलंImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 17, 2026 | 1:18 AM
Share

भारत इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आहे. त्यामुळे दोन सामन्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेचा निकाल तिसऱ्या सामन्यात लागणार आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील तिसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला. त्यामुळे मनात नसताना प्रथम फलंदाजी वाटेला आली. भारताने या सामन्यात चांगली सुरूवात केली, पण मधल्या फळीत विकेटची रांग लागली आणि धावगतीला ब्रेक लागला. भारताने 44 षटकात सर्व गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 4 गडी राखून पूर्ण केलं.

इंग्लंडचा डाव

भारताने विजयासाठी दिलेल्या 233 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने बेन डकेटला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जेकब बेथेलही 4 धावा करून तंबूत परतला. असं असताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जो रूटने विजयी झुंज दिली. त्याच्यासोबत फलंदाजीला आलेले हॅरी ब्रूक 16, सॅम करन 26, जोस बटलर 17, विल जॅक्स 30 धावा करून बाद झाले. पण जो रूट एका बाजूने किल्ला लढवत होता. त्याने भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं आणि विजयाची स्क्रिप्ट लिहिली. त्याचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं आणि भारताच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला. इंग्लंडने हा सामना 4 गड राखून जिंकला.

भारताचा डाव

भारताकडून रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 30 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी जमली. या जोडीने 60 धावांची भागीदारी केली. पण रोहित शर्मा 26 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर इशान किशनने 8 चेंडू खेळले आणि 1 धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीने 65 धावांची खेळी केली. त्याला उपकर्णधार श्रेयस अय्यरची साथ लाभली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 67 धावा केल्या. विराट कोहली बाद झाल्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या. श्रेयस अय्यर झुंज देत असताना वॉशिंग्टन सुंदर 2, अक्षर पटेल 1, शिवम दुबे 0. गुरनूर ब्रार 7 आणि प्रसिद्ध कृष्णा 0 धावांवर बाद झाले. तर श्रेयस अय्यरने 66, तर जसप्रीत बुमराहने नाबाद 20 धावा केल्या.

Follow Us
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु