Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पक्षाने (आप) कोल्हापुरात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत आपच्या कार्यकर्त्यांनी थेट दुचाकीची अंत्ययात्रा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
आपच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनावर विपरीत परिणाम होत असून, वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे. या धोरणाचा फेरविचार करावा आणि वाहनधारकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, या अनोख्या आंदोलनामुळे कोल्हापुरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले. आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाचा निषेध नोंदवला.
या आंदोलनानंतर इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत सरकार कोणती भूमिका घेते आणि वाहनधारकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 16, 2026 04:04 PM
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452