AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

सरकार स्थापनेपासूनच थलापती विजय यांच्यापुढे संकटाचे नवनवे डोंगर उभे राहात आहेत. सध्या तर तामिळनाडूत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेला विरोधकांनी लावून धरले आहे.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?
thalapathy vijayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2026 | 3:32 PM
Share

Thalapathy Vijay : तामिळनाडूचं राजकारण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहे. मे महिन्यात पर पडलेल्या विधानसभा निवडणुकीत येथे दिग्गज अभिनेता थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने दमदार विजय मळवला. त्यानंतर थलापती विजय हे थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. परंतु सरकार स्थापनेपासूनच थलापती विजय यांच्यापुढे संकटाचे नवनवे डोंगर उभे राहात आहेत. सध्या तर तामिळनाडूत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेला विरोधकांनी लावून धरले आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री थलापती विजय यांना अडकित्त्यात पडकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.

तामिळनाडूत नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये तेथे एका दिव्यांग कैद्याचा तुरुंगात असताना मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूच्या नागरकोईल येथे घडली आहे. मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव एस सबरी वर्मन असे आहे. सुरूवातीला या कैद्याचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झाला असावा, असे म्हटले जात होते. परंतु उत्तरीय चाचणीनंतर या कैद्याच्या शरीरावर वेगवेगळ्या 19 ठिकाणी जखमा असल्याचे समोर आले. त्यानंतर तामिळनाडूमध्ये राजकारण पेटले आहे. वर्मन या व्यक्तीला अवैध गुटखा विक्रीच्या आरोपाखाली 9 जुलै रोजी थेंथमराईकुलम येथून अटक करण्यात आले होते.

8 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार 13 जुलै रोजी तुरुंगात असताना रात्री वर्मन आणि इतर कैद्यांमध्ये भांडण झाले. इतर कैद्यांनी वर्मन यांना खूप मारले. हे भांडण सोडवण्यासाठी तुरुंगातील अधिकारी आले. या अधिकाऱ्यांनीही वर्मन यांना खूप मारल्याचा आरोप केला जातोय. या घटनेनंतर सीसीटीव्ही तपासण्यात आले. उपलब्ध प्रथमदर्शनी पुराव्यानुसार तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना निलंबित करून अटक करण्यात आले आहे. 8 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली

दरम्यान, विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, असा आरोप केला जातोय. विजय यांचे सरकार फक्त तमाशा पाहात आहे, असा हल्लाबोल डीएमके पक्षाकडून केला जातोय.

Follow Us
प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? राज ठाकरेंनी...
Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले...
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले, प्रसाद लाड यांना थेट इशारा!
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य