AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह तब्बल १४ जणांवर एका ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?
eknath shinde
| Updated on: Jul 16, 2026 | 11:38 PM
Share

उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी यांच्या सह १४ जणांवर पुण्यातील एका कंत्रारटादाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पुणे येथील बांधकाम ठेकेदार खलील शेख यांनी आत्महत्या करण्याच्या आधी एक व्हिडीओ व्हायरल करीत अनेकांवर आरोप केले आहेत. खलील शेख यांच्या कुटुंबियांनी बाळा शेंडगे यांच्या सह रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी असे १४ जणांवर  आरोप केले आहेत.

पुणे येथील बांधकाम ठेकेदार आणि व्यावसायिक खलील शेख यांनी बिल थकल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले आहे. या प्रकरणात त्यांनी आधी व्हिडीओ व्हायरल करुन जीवन का संपवत आहे याचा खुलासा केला आहे. या प्रकल्पात चार जण होते. रवींद्र धंगेकर जर आज म्हणत आहेत की आम्ही प्रकल्पातून बाहेर पडलो आहोत. परंतू एक वर्षे काम बंद पडल्याने वडीलांवर कर्ज झाले ते कोणामुळे झाले. त्यांनी आत्महत्या करण्याआधी सगळ्यांची नावे घेत त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले होते असे त्यांच्या मुलाने टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले.

खलिल शेख यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

या प्रकरणात बाळा शेंडगे मुख्य आहेत, त्यांनी आमचं तिथलं सामान पण आणू दिलं नाही. आमचे साहित्य तिथे आणायला गेले तर हात लावू दिला नाही. आमच्या वडिलांचा मोबाईल पोलीस घेऊन गेले आहेत त्यावर आता तपास करतील असे पीडीत खलिल शेख यांच्या मुलांनी सांगितले.

म्हणून शिवसेनेत आलो, पण तरीही त्रास सुरु

आमच्यावर पण आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, माझ्यामुळे माझ्या मित्रांना त्रास झाला आहे. 2025 मध्ये या प्रोजेक्टमधून आम्ही माघार घेतली. खलील शेख यांना आतापर्यंत 70 ते 80 लाख रुपये आम्ही दिले आहे.या सगळ्या त्रासामुळेच मी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र शिवसेनेत आल्यावर देखील त्रास सुरु आहे. माझी पत्नी या असोसिएट मधून 2025 मध्ये बाहेर पडली आहे.आमच्यासाठी ती दुर्दैवी घटना आहे असे माजी आमदार शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक