AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar News: ‘मोर्चात पक्षाचे चिन्ह का नको?’, रोहित पवारांंनी प्लॅन सांगितला, स्वतंत्र चाचपणीवर थेट बोलले!

"जेव्हा आपले सरकार होते तेव्हा सर्व निर्णय अजित पवार घ्यायचे. मात्र सध्या पुण्याचे सीपी फक्त भाजप नेत्यांचे विशेषत: मुख्यमंत्र्‍यांचे ऐकतात. त्यामुळे सुनेत्रा काकींची अडचण होते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना सांगा, सुनेत्रा पवार यांना ताकद द्या असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar News: 'मोर्चात पक्षाचे चिन्ह का नको?', रोहित पवारांंनी प्लॅन सांगितला, स्वतंत्र चाचपणीवर थेट बोलले!
Rohit Pawar
| Updated on: Nov 26, 2026 | 5:55 PM
Share

Rohit Pawar News:  “मी स्वतः पुणेकर म्हणून अजितदादांनाच पुण्याचे पालकमंत्री म्हणून पाहिलं आहे. त्यामुळे दादांबाबत बोलताना काहीप्रमाणात मी भावुक होतो.  त्यामुळे मी आक्रमकपणे बोललो असेल आणि सुनेत्रा वहिनींना यांना वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र मी चुकीचे बोललो असे नाही, अजित पवार यांचा अधिकाऱ्यांवर कंट्रोल होता, पुण्याचे सीपी फक्त भाजपचे ऐकतात, त्यामुळे सुनेत्रा काकींची अडचण होते,” असा आरोपही यावेळी रोहित पवार यांनी केला.

‘पुण्याचे सीपी कोणाचेच ऐकत नाहीत..’

“जेव्हा आपले सरकार होते तेव्हा सर्व निर्णय अजित पवार घ्यायचे. मात्र सध्या पुण्याचे सीपी फक्त भाजप नेत्यांचे विशेषत: मुख्यमंत्र्‍यांचे ऐकतात. त्यामुळे सुनेत्रा काकींची अडचण होते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना सांगा, सुनेत्रा पवार यांना ताकद द्या असं रोहित पवार म्हणाले. तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलायचे झाले तर फार वाईट अवस्था झाली आहे, हे आकड्यांनुसार आपण सांगू शकतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात नसेल तर मुख्यमंत्र्‍यांनी सक्षम नेत्याला ते पद द्यावे,” अशी मागणीही रोहित पवार यांनी केले.

तसेच “आम्हाला आक्रमक भूमिका म्हणा किंवा पिसाळल्यासारखे बोलतोय म्हणा.. मात्र जेव्हा सामान्य व्यक्तीला अडचण येते तेव्हा आम्ही पिसाळल्यासारखे वागल्याशिवाय राहणार नाही. आम्ही विरोधात आहोत, भूमिका घेत राहणार. तुमच्या नेत्याला बोलल्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. मात्र आम्ही भूमिका घेणार आहे, आम्ही लढत राहणार आहे,” असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मोर्चाला पक्षाचे चिन्ह का नको?

या “बैठकीत दुष्काळाबाबत चर्चा झाली. दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला कशी मदत करता येईल याची चर्चा झाली. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. हे आंदोलन पुर्णपणे अराजकीय आहे.. आत्ता लोकांवर आलेली दुष्काळाची समस्या सोडवण्यासाठीच ही आंदोलन आहे. पवार साहेबांचा फोटो फक्त यासाठीच आहे की साहेबांनी महिला, शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. हे कुठेही राजकीय आंदोलन वाटू नये. याला कोणत्याही प्रकारचे राजकीय वळण येऊ नये म्हणून पक्षाचा झेंडा, चिन्ह नको. सत्तेतला भाजप पक्ष हे राजकीय आंदोलन आहे असं म्हणेल म्हणून सर्वांचीच हा अराजकीय मोर्चा व्हावा अशी इच्छा आहे,” असं रोहित पवार म्हणालेत.

Follow Us
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा