AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शक्तिपीठविरोधातील आंदोलन पेटलं, शेतकरी ताब्यात, राजू शेट्टी थेट पोलीस ठाण्यात दाखल

मोठी बातमी समोर येत आहे, शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध होत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. शक्तिपीठ माहामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ही जमीन मोजणी बंद पाडल्याचं पहायला मिळत आहे.

शक्तिपीठविरोधातील आंदोलन पेटलं, शेतकरी ताब्यात, राजू शेट्टी थेट पोलीस ठाण्यात दाखल
शेतकऱ्यांचा शक्तिपीठ प्रकल्पाला विरोध Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 5:55 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध होत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. शक्तिपीठ माहामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ही जमीन मोजणी बंद पाडल्याचं पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून मोठ्या  पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणीचं काम सुरू आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. जमीन मोजणी बंद पाडण्यासाठी आलेले शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली आहे. यावेळी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आता या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची देखील एन्ट्री झाली आहे. आंदोलकांना सोडवण्यासाठी राजू शेट्टी थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन तिसऱ्या दिवशीही  कायम आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी प्रक्रिया सुरू असून, याला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. खानापूर तालुक्यातल्या भाळवणी येथे मोजणीवरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापटीचा प्रकार घडला आहे.  यावेळी शेतकरी आंदोलकांकडून पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी एका शेतकरी महिलेला फरफटत नेल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला आहे.

तर दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांची पोलिसांकडून धरपकड देखील करण्यात आली आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे कडेगावच्या चिंचणी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी आता शेतकरी आंदोलकांच्या उपस्थितीमध्ये राजू शेट्टी यांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी सोडून द्यावं, अशी मागणी केली आहे.  त्यामुळे हे आंदोलन आता अधिक तापण्याची शक्यता आहे.

शेतकरी आक्रमक  

दरम्यान शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांकडून या महामार्गाला मोठा विरोध होत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमीन मोजणी प्रक्रिया बंद पडली आहे. यामुळे मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.  पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचं देखील पहायला मिळत आहे.

Follow Us
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा