AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Silk Smitha : पतीकडून छळ, डिप्रेशन अन् दारूचं व्यसन; पडद्यावर बोल्ड भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खडतर आयुष्य, 35व्या वर्षी स्वतःला संपवलेलं

Bollywood Actress : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यात प्रचंड त्रास सहन केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया.

Silk Smitha : पतीकडून छळ, डिप्रेशन अन् दारूचं व्यसन; पडद्यावर बोल्ड भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खडतर आयुष्य, 35व्या वर्षी स्वतःला संपवलेलं
| Updated on: Nov 26, 2026 | 5:48 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्क स्मितानं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं एकेकाळी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. अभिनेत्रीच्या नावावर चित्रपट चालतील, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अवघ्या काही वर्षांत तिनं प्रचंड लोकप्रियता आणि संपत्ती मिळवली. मात्र, याच झगमगाटामागे अभिनेत्रीचं आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेलं होतं. गरिबी, बालवयात झालेलं लग्न, घरगुती हिंसाचार आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार यांचा सामना करत अभिनेत्रीनं मनोरंजनविश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. मात्र, वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत झाला.

बालपण गरिबीत, वयाच्या 14व्या वर्षी लग्न

सिल्क स्मिताचं खरं नाव विजयलक्ष्मी होतं. 2 डिसेंबर 1960 रोजी अभिनेत्रीचा जन्म एका गरीब तेलुगू कुटुंबात झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिचं बालपण अनेक अडचणींमध्ये गेलं. परिस्थितीमुळे तिला चौथी इयत्तेतच शिक्षण सोडावं लागलं. त्यातच वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी अभिनेत्रीचं लग्न एका मजुराशी लावून देण्यात आलं. ज्या वयात शिक्षण, स्वप्नं आणि स्वतःचं आयुष्य घडवण्याची वेळ होती, त्याच वयात ती संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकली.

पतीकडून छळ, अखेर घर सोडण्याचा निर्णय

लग्नानंतर सिल्क स्मिताला सासरीही गरिबीचा सामना करावा लागला. त्यातच पतीच्या दारूच्या व्यसनामुळे तिचं आयुष्य अधिक कठीण झालं. पतीकडून वारंवार मारहाण आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. इतकंच नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांकडूनही अभिनेत्रीचा छळ होत होता. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अखेर सिल्क स्मितानं सासर सोडण्याचा निर्णय घेतला. अत्याचार सहन करण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

सासर सोडल्यानंतर अभिनेत्रीसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. सुरुवातीला तिनं एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या घरी काम केलं. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील लोकांशी ओळख वाढू लागली. निर्माते आणि कलाकारांच्या संपर्कात आल्यानंतर तिनं मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच काळात तिला अभिनयाची संधी मिळाली. एकदा एका निर्मात्याची आलिशान गाडी पाहून अभिनेत्रीनंही अशीच गाडी स्वतःच्या मालकीची असावी, असं स्वप्न पाहिलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीनं चित्रपटांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. अभिनयाचं विशेष प्रशिक्षण नसतानाही आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि अदांच्या जोरावर तिनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

450 हून अधिक चित्रपटांत काम, मानधनही लाखोंमध्ये

1979 मध्ये ‘इनाये थेडी’ या मल्याळम चित्रपटातून सिल्क स्मितानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वंडीचक्करम’ या तमिळ चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या व्यक्तिरेखेचं नाव ‘सिल्क’ होतं. पुढे याच नावानं ती संपूर्ण चित्रपटसृष्टीत लोकप्रिय झाली. अवघ्या चार वर्षांत अभिनेत्रीनं जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. कमल हासन आणि रजनीकांत यांसारख्या दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबतही तिनं काम केलं. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सदमा’ या हिंदी चित्रपटातून अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं.

स्टारडमनंतर वैयक्तिक आयुष्यात वाढल्या अडचणी

एकीकडे चित्रपटसृष्टीत सिल्क स्मिताचं नाव मोठं होत होतं, तर दुसरीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. तिनं चित्रपट दिग्दर्शनातही नशीब आजमावलं. मात्र सिल्क स्मिताला अपेक्षित यश मिळालं नाही. चित्रपट अपयशी ठरू लागल्यानंतर त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण वाढला. अभिनेत्रीला दारूचं व्यसन लागलं होतं आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. अभिनेत्रीनं एका डॉक्टरशी लग्न केल्याचंही म्हटलं जातं. मात्र तिचं वैवाहिक आयुष्यही फार काळ टिकू शकलं नाही.

घरात आढळला मृतदेह, वयाच्या 35व्या वर्षी आयुष्याचा शेवट

23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्क स्मिताचा मृतदेह राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. एकेकाळी आपल्या नावावर चित्रपटांना गर्दी खेचणाऱ्या अभिनेत्रीचा असा दुर्दैवी अंत होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटामुळे सिल्क स्मिताची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली. अभिनेत्री विद्या बालननं या चित्रपटात सिल्क स्मितापासून प्रेरित व्यक्तिरेखा साकारली होती.

Follow Us
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा