राज्यावर संकट, गारपिटीचा मोठा इशारा, पुढील 24 तास अत्यंत धोक्याची, तब्बल इतक्या जिल्ह्यात..
Heavy Rainfall Forecast : देशासह राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही तास धोक्याची असणार आहेत. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा इशारा देण्यात आला.

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज मोठा अलर्ट जारी केला. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला. फक्त पाऊसच नाही तर गारपिटीचाही इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. परभणी, धाराशिव आणि धुळे येथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातून उष्णता कमी झाली आहे. आता अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसतोय. देशातील अनेक राज्यात पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आहे. चक्रीवादळ आणि अतिमुसळधार पाऊस अशी स्थिती आहे. तापमानात चढउतार बघायला मिळेल. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काल जोरदार पावसाने हजेरी लावली.
मॉन्सून लवकरच राज्यात दाखल होईल. त्यापूर्वी अवकाळी पाऊस कोसळत आहे. नांदेड जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकाडाटासह हा पाऊस होता. उमरी तालुक्यातील बोळसा येथे वीज कोसळून आठ शेळ्या आणि एक गाय ठार झाल्याची घटना समोर आलीये. बोळसा येथील संतोष चिकटवाड शेतातून आपली जनावरे घेऊन घराकडे जातं असतांना अचानक वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरु झाला.
जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. वादळी वारा व विजांच्या कळकटाटासह जळगाव शहरात तब्बल अर्धा तासापर्यंत मुसळधार पाऊस सुरू. अचानकच्या मुसळधार पावसामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची धांदल उडाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते सायंकाळच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस आला.
परभणीत सायंकाळच्या सुमारास अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यांमुळे पोखर्णी शिवारातील घरावरील पत्रे उडाली. पोखर्णी रेल्वे स्टेशनंवरील पत्रे उडून विद्युत तार तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत. गेल्या तासाभरापासून पोखर्णी स्टेशनवरच रेल्वे थांबून असल्याची माहिती. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव शिवरात वीज पडल्याने दोन जनावरांचा मृत्यू. जोरदार वाऱ्यासह पाऊस असल्याने मोठे नुकसान झाले. अनेक घरांचे नुकसान झाले.