AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदिरा गांधी संभाजीनगरात आल्या, शिरा नाकारला आणि… 1972 च्या दुष्काळातली ती आठवण ताजी; काय घडलं होतं?

इंदिरा गांधी यांच्यासोबत आमचे काही फोटो होते. परंतु त्या फोटोंना पाणी लागलं ते खराब झाले. इंदिरा गांधी आमच्याशी बोलल्या होत्या. त्यांनी तुमच्या विहिरीचे काम करायचे का? असे विचारले होते, अशी आठवण लिलाबाई यांनी सांगितली.

इंदिरा गांधी संभाजीनगरात आल्या, शिरा नाकारला आणि... 1972 च्या दुष्काळातली ती आठवण ताजी; काय घडलं होतं?
indira gandhi and sambhaji nagarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 9:13 PM
Share

 ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी : छत्रपती संभाजीनगरच्या पांढरी पिंपळगावात 1972 च्या दुष्काळाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1972 मध्ये गावात येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. या दौऱ्यावेळी तत्कालीन सरपंचांच्या पत्नी असलेल्या लिलाबाई मोरे यांनी इंदिरा गांधींच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. इंदिरा गांधींसाठी लिलाबाई यांनी शिरा करण्याचा बेत आखला होता, मात्र इंदिरा गांधींनी शिरा नाकारत मजुरांसाठी जे जेवण बनवलं होतं, तेच जेवण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर 1972 सालच्या दुष्काळाच्या आणि इंदिरा गांधी यांच्या संभाजीनगरातील दौऱ्याच्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या झाल्या आहेत.

इंदिरा गांधींच्या पाहणीनंतर त्यांच्या शेतात…

मजुरांसोबत बसून इंदिरा गांधींनी साधं वरण-भात आणि पोळी खाल्ली, माठातील पाणी प्यायलं, अशी आठवण लिलाबाई मोरे यांनी सांगितली तसंच, इंदिरा गांधींच्या पाहणीनंतर त्यांच्या शेतात सरकारच्या योजनेतून विहीर झाली आणि त्या विहिरीला पाणीही लागलं, असं लिलाबाई मोरे यांनी सांगितलं.

इंदिरा गांधी यांच्यासोबत आमचे काही फोटो होते. परंतु त्या फोटोंना पाणी लागलं ते खराब झाले. इंदिरा गांधी आमच्याशी बोलल्या होत्या. त्यांनी तुमच्या विहिरीचे काम करायचे का? असे विचारले होते. मी हो करा असं सांगितलं होतं. आज आमच्या शेतात जी विहीर आहे ती इंदिरा गांधी यांनीच करून दिलेली आहे. त्या विहिरीला पाणी लागलं होतं. एक परस काम झालं तेव्हा पाणी लागलं होतं. आम्ही हाताने पाणी काढायचो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

तो दुष्काळ मोठा होता हा पण मोठाच आहे

पुढे बोलताना त्यांनी 1972 सालचा दुष्काळ कसा होता, याच्याही काही आठवणी सांगितल्या. तेव्हा अशीच परिस्थिती होती. मात्र लाल ज्वारी तेव्हा खायला होती. सगळे तीच ज्वारी खायचे. तेव्हाच्या दुष्काळात लोकांकडे काहीच नव्हतं. 1972 सालच्या दुष्काळाचा काळ खूप कठीण होतं. तो दुष्काळ मोठा होता हा पण मोठाच आहे, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप