गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचा सुरुंग, 11 जागांवर मिळवला विजय

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचा सुरुंग, 11 जागांवर मिळवला विजय

जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रियेनंतर राजकीय पक्षांमध्ये दावे-प्रतिदाव्यांचे द्वंद्व रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 18, 2021 | 12:36 PM

जळगाव : जामनेरमध्ये भाजच्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने खातं उघडलं आहे. हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, वाकोदमध्ये राष्टवादीने खातं उघडलं आहे. तर एकूण अकरा जागा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्ष विरहीत मानली जात असली तरी, जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रियेनंतर राजकीय पक्षांमध्ये दावे-प्रतिदाव्यांचे द्वंद्व रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (jalgaon Gram Panchayat Election Results 2021 bjp Girish Mahajan ward NCP won on 11 seats)

कोरोना काळात होत असलेली ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असणार आहे. ग्रामीण भागात आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी तशी मोर्चेबांधणी देखील केली. आता काही तासातच या निवडणुकीचे चित्र निकालातून स्पष्ट होणार असल्याने नेतेमंडळींची घालमेल वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात नेमकं काय चित्र असेल? याची उत्सुकता मतदारांप्रमाणे राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा रंगला सामना

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ आहे. तर भाजप विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडत आहे. राज्यस्तरावरील याच राजकीय मोर्चेबांधणीचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रुपाने ग्रामीण भागात पाहायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष म्हणून नाही तर गावकी-भावकीच्या माध्यमातून लढली जाते. असे असले तरी जळगावात मात्र सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत एकमेकांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना प्रत्येक ठिकाणी रंगल्याचे दिसून आले. आता निकालानंतरच कोणता पक्ष वरचढ आहे, हे कळणार आहे. (jalgaon Gram Panchayat Election Results 2021 bjp Girish Mahajan ward NCP won on 11 seats)

संबंधित बातम्या – 

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : खडसेंच्या कोथळी गावात गृहयुद्ध, भाजप-राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: चौंडी गावात राम शिंदेना पुन्हा धक्का, आमदार रोहित पवारांची बाजी

(jalgaon Gram Panchayat Election Results 2021 bjp Girish Mahajan ward NCP won on 11 seats)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें