AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : खडसेंच्या कोथळी गावात गृहयुद्ध, भाजप-राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच होते, मात्र आता भाजपचा सरपंच होणार आहे. (Kothali Gram Panchayat Eknath Khadse Vs Raksha Khadse)

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : खडसेंच्या कोथळी गावात गृहयुद्ध, भाजप-राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे
| Updated on: Jan 18, 2021 | 12:32 PM
Share

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालावेळी खडसे कुटुंबात गृहयुद्ध पाहायला मिळत आहे. कारण कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा भाजप खासदार आणि एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी केला आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्याकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत. राज्यभरातील जवळपास 14 हजार ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. (Jalgaon Muktainagar Kothali Gram Panchayat Election Eknath Khadse Vs Raksha Khadse)

सासरेबुआ vs सूनबाई

कोथळी ग्रामपंचायतीत 11 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 9 पैकी 6 जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच होते, मात्र आता भाजपचा सरपंच होणार आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडून भाजपकडे गेल्या आहेत. सत्तांतरामुळे सूनबाईंनी सासरेबुवांना धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्याकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत.

“राजकीय बदलामुळे मोठी जबाबदारी”

“या निवडणुकीत झालेल्या राजकीय बदलामुळे मोठी जबाबदारी माझ्यावर होती. पहिल्यांदा मी बारकाईने या निवडणुकीत लक्ष घातले असून त्यात मला यश मिळाले आहे” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

कोथळी ग्रामपंचायीतवर भाजपचा झेंडा

भाजपचे कोणते 6 उमेदवार विजयी?

उमेश राणे, अनुराधा योगेश चौधरी, नारायण चौधरी, मीराबाई शामराव पाटील, वंदना विजय चौधरी, राखी गणेश राणे

मुक्ताईनगरात एकनाथ खडसेंचीच हवा

मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी नऊ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे.

पक्ष दोन, कुटुंब एकदिल

एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे एकाच कुटुंबात, एकाच घरात राहूनही सून रक्षा खडसे भाजपमध्ये तर एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे खेवलकर राष्ट्रवादीत अशी स्थिती पाहायला मिळत आहे. (Jalgaon Muktainagar Kothali Gram Panchayat Election Eknath Khadse Vs Raksha Khadse)

कुटुंब म्हणून आम्ही सोबतच : रक्षा खडसे

“परिवार म्हणून आम्ही सोबतच आहे, नाथाभाऊ इथे असते तर आम्ही सोबतच मतदान केले असते. एका घरात राहतो, विचार पक्षांना घेऊन वेगवेगळे असू शकतात. एकनाथ खडसे मुंबईत असल्यामुळे मी मतदानाचा हक्क गावकऱ्यांसोबत बजावला” असं मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रक्षा खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं. मुक्ताईनगरमध्ये 47 ग्रामपंचायत निवडणुका असून 14.60 टक्के मतदान झाले होते.

संबंधित बातम्या :

पाटणमध्ये शिवसेना नेते शंभूराज देसाई यांची बाजी, तर राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची पिछाडी

एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा

चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

 मोहिते पाटील गटाचं वर्चस्व कायम, भाजपची घौडदौड

(Jalgaon Muktainagar Kothali Gram Panchayat Election Eknath Khadse Vs Raksha Khadse)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.