Sanjay Shirsat | राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका करत म्हटले की, महाराष्ट्र सध्या “आयसीयूमध्ये” आहे. महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले. पराभवानंतर कार्यकर्त्यांना धीर देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आणि सांगितले की, “आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता राज्य आयसीयूमध्ये असल्यासारखे वाटते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका करत म्हटले की, महाराष्ट्र सध्या “आयसीयूमध्ये” आहे. महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले. पराभवानंतर कार्यकर्त्यांना धीर देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आणि सांगितले की, “आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता राज्य आयसीयूमध्ये असल्यासारखे वाटते. जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला आपण सूज म्हणू शकतो. ही इतकी घाणेरडी सूज आहे की अनेकांना वाटतं, जे काही चालू आहे ते कायमस्वरूपी आहे. पण कायमस्वरूपी काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते.” सत्तेत असणाऱ्यांना इशारा देत त्यांनी म्हटले, “सत्तेत असणाऱ्यांनाही एक्सपायरी असते.”
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, महाराष्ट्र आयसीयूमध्ये नव्हे, तर कोरोनाच्या काळात किंवा उबाठाच्या राज्यात असताना आयसीयूमध्ये होता. मात्र महायुतीने राज्याला बाहेर काढण्याचे काम केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “अनेक प्रकल्पांना महायुतीने चालना दिली आहे आणि मुंबईतील अनेक प्रोजेक्ट्स यशस्वी झाले आहेत. त्यामुळे सूज उतरवण्याचे काम महायुतीने केले आहे. भविष्यात महाराष्ट्र अग्रेसर घेऊन जाण्यासाठी सर्वांचं सहकार्य आणि राज ठाकरे यांचं सहकार्यही आम्ही घेणार आहोत.”
Published on: Feb 21, 2026 03:42 PM
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट

