माळशिरस ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मोहिते पाटील गटाचं वर्चस्व कायम, भाजपची घौडदौड

माळशिरस तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे.

माळशिरस ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मोहिते पाटील गटाचं वर्चस्व कायम, भाजपची घौडदौड
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 11:43 AM

पंढरपूर : माळशिरस तालुक्यावर पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. कारण माळशिरस तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि भाजपसाठी मोठा विजय ठरला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.(BJP’s Mohite-Patil group continues to dominate in Malshiras)

माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटानं सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा निकालही जाहीर झाला आहे. विठ्ठलवाडीमध्ये 7 पैकी 7 ही जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटानं आपला झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर उमेदवारांनी विजयी रॅली काढली. माळशिरससह पंढरपूर आणि सांगोल्यातही भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे.

रेडेर गणेशगाव आणि पिरळे ग्रामपंचायतीवरही भाजपच्या मोहिते पाटील गटाने सत्ता मिळवली आहे. त्याचबरोबर येळीव, विजयवाडी आणि खवळे ग्रामपंचायतीवरही विजयसिंह मोहिते पाटील गटाने विजय मिळवला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर माळशिरस तालुक्यात भाजपचा दबदबा पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीतही भाजपनं आयात उमेदवार दिला होता. तरीही मोहिते-पाटील यांनी राम सातपुते यांना विजय मिळवून दिला होता.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना मोठा धक्का

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी खानापूरमध्ये विजय खेचून आणला आहे.

संबंधित बातम्या : 

Kolhapur Gram Panchayat Election Results 2021: प्रकाश आबिटकरांनी करुन दाखवलं, खानापुरात चंद्रकांत पाटलांना हरवलं, सेनेचा झेंडा

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड

सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती, निगडी गावात बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा विजय

BJP’s Mohite-Patil group continues to dominate in Malshiras

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.