AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड

राज्यभरातील ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेची विजयी घौडदौड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 18, 2021 | 10:56 AM
Share

मुंबई : राज्यातील 12 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेची विजयी घौडदौड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ विरोधी पक्ष असलेला भाजपलाही अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज जसेजसे निकाल हाती येत आहेत, तसं शिवसेनेच्या वर्चस्वाखालील ग्रामपंचायतींची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा पहिला भगवा फडकल्याचं दिसून आलं.(Shiv Sena’s big victory in Gram Panchayat election results)

हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीचे 13 पैकी 10 उमेदवार विजयी झाले आहेत. निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. तिकडे राधानगरी मतदारसंघातील बारवे गावात शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. बारवे गावात आबिटकर गटाने 9 पैकी 6 जागा जिंकत विजय मिळवला आहे.

हातकणंगले तालुक्यातील बिरदेववाडीत भाजपला जोरदार धक्का देत शिवसेनेनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. बिरदेववाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं 7 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. हा विजय मिळवून शिवसेनेनं भाजपची 40 वर्षाची परंपरा खंडीत केली आहे. तिकडे सोलापूरमधील नांदणी ग्रामपंचायतीवरही शिवसेनेचा विजय झाला आहे. एकूण 9 जागांपैकी 6 जागांवर विजय मिळवत शिवसेननं सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला 3 जागा मिळवण्यात यश आलं आहे.

कोरेगाव तालुक्यात शशिकांत शिंदेंना धक्का

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात महाविकास आघाडीतील सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 5 ग्रामपंचायती शिवसेनं खेचून आणल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळापूर, किन्हई पेठ, कटापूर, ल्हासुर्णे आणि देऊर या राष्ट्रवादीच्या ताब्यातील ग्रामपंचायती शिवसेनेनं खेचून आणल्या आहेत.

पाटण तालुक्यात शिवसेनेचा सर्वात मोठा विजय

शिवसेनेला सर्वात मोठा विजय सातारा जिल्ह्यात मिळताना पाहायला मिळत आहे. कारण सातऱ्यातील पाटण तालुक्यात आतापर्यंत 18 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तर 8 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारल्याची पाहायला मिळत आहे. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील नागरिकांचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचा झटका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या मूळ गावात शिवसेनेनं पाटलांना मोठा झटका दिला आहे. खानापूर गावातील 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचा इथं विजय झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Hatkanangale Gram Panchayat Election Results 2021: कोल्हापुरात जनसुराज्यपाठोपाठ शिवसेनेची कमाल; मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

Gram Panchayat Election Results 2021 : माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा धुराळा, 3 ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा

Shiv Sena’s big victory in Gram Panchayat election results

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...