Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा
Eknath Khadse

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. भाजपकडे त्यांची उणीव भरुन काढणारे नेते असल्याचा दावा गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्यात आला होता.

Rohit Dhamnaskar

|

Jan 18, 2021 | 12:16 PM

जळगाव: एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी नऊ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे. (Mahavikas Aghadi govt panel wins in Muktainagar)

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. भाजपकडे त्यांची उणीव भरुन काढणारे नेते असल्याचा दावा गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता मुक्ताईनगरमधील निकाल पाहता या संपूर्ण पट्ट्यात एकनाथ खडसे यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.

कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालांवरुन खडसे परिवारात ‘गृहयुद्ध’

कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालांवरुन खडसे परिवारात गृहयुद्ध सुरु झाले आहे. याठिकाणी पाच जागांवर शिवसेना तर सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र, आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून आपल्या विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोथळी हे एकनाथ खडसे यांचे गाव आहे.

गिरीश महाजनांनी वर्चस्व राखले

गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील आपले वर्चस्व राखले आहे. तालुक्यातील 90 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकली आहे. मात्र, काही ठिकाणी  राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे.

खानापुरात चंद्रकांत पाटलांना हरवलं, सेनेचा झेंडा

शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावातील खानापूर गावात सत्तांतर घडवलं आहे. खानापूरमध्ये सेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. खानापूरमधील शिवसेनेचा विजय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होते. मात्र, तरीही शिवसेनेच्या प्रकाश आबिटकरांनी विजय खेचून आणला.

संबंधित बातम्या:

चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

Kolhapur Gram Panchayat Election Results 2021: प्रकाश आबिटकरांनी करुन दाखवलं, खानापुरात चंद्रकांत पाटलांना हरवलं, सेनेचा झेंडा

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड

Gram Panchayat Election Results 2021: राज ठाकरे म्हणाले ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवा; पण मनसेचं इंजिन धावलंच नाही

(Mahavikas Aghadi govt panel wins in Muktainagar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें