AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी, ऐनवेळी आईच प्रियकरासोबत पळाली, नंतर स्टेटसमुळे जे घडलं…

जळगावच्या जामनेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या ५ दिवसांवर असताना आईने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले, ज्यामुळे कुटुंबावर मोठी नाचक्की ओढवली आहे.

घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी, ऐनवेळी आईच प्रियकरासोबत पळाली, नंतर स्टेटसमुळे जे घडलं...
marriage
| Updated on: Jun 08, 2026 | 12:42 PM
Share

मुलीचा साखरपुडा अवघ्या ५ दिवसांवर आलेला असताना तिच्या आईनेच प्रियकरासोबत पलायन करून लग्न उरकल्याची एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पीडित कुटुंबावर सामाजिक नाचक्कीची वेळ आली आहे.

‘स्टेटस’मुळे फुटले भांडे

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील एका कुटुंबात मुलीचा साखरपुडा ठरला होता. त्यांच्या घरात लग्नाची आणि साखरपुड्याची तयारी घरात उत्साहात सुरू होती. मात्र साखरपुड्याला अवघे पाच दिवस शिल्लक असतानाच मुलीच्या आईने अचानक घरातून पळ काढला. यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत थेट लग्न केले. हा सर्व प्रकार गुप्त होता.

मात्र तिच्या आईच्या प्रियकराने त्यांच्या विवाहाचे फोटो आपल्या मोबाईलच्या व्हाट्सॲप स्टेटसवर ठेवताच हा सर्व प्रकार उघडकीस आला. प्रियकराने स्टेटस ठेवताच संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आणि ओळखीच्या लोकांनी ते फोटो पाहिले. यानंतर मुलीच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला. ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, तिथे अचानक शांतता पसरली. आपल्या पत्नीने असे पाऊल उचलल्याने आणि प्रियकराने ते फोटो सोशल मीडियावर जाहीर केल्याने समाजात कुटुंबाची मोठी नाचक्की सुरू झाली. या परिस्थितीने हतबल झालेला महिलेचा पती थेट जामनेर पोलीस ठाण्यात पोहोचला.

पाच दिवसांवर मुलीचा साखरपुडा आहे, समाजात आमची मोठी नाचक्की होत आहे. कृपया त्यांना ते मोबाईलवरील स्टेटस तातडीने काढायला सांगा, अशी केविलवाणी आणि आर्त विनंती पतीने पोलिसांकडे केली.

पोलिसांनी दाखवला खाक्या, प्रकरणावर पडदा

पतीची ही हृदयद्रावक व्यथा ऐकल्यानंतर जामनेर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. पोलिसांनी तात्काळ त्या प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्याला कायद्याचा आणि सामाजिक परिस्थितीचा खाक्या दाखवत योग्य ती समज दिली. पोलिसांनी समज दिल्यानंतर प्रियकराने आपल्या मोबाईलवरून ते स्टेटस हटवले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर तात्पुरता पडदा पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या अजब लग्नाची चर्चा आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रंगली आहे.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल