AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघांनी आयुष्य संपवण्याचं ठरवलं, लॉजवर गेले… फास लावला पण… त्याचं काय झालं? त्या घटनेने जळगावात हळहळ

जळगावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका प्रेमयुगुलाने लॉजवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ज्यात तरुण रवींद्र मोरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर फास तुटल्याने मुलगी बचावली. या घटनेने जळगावात हळहळ व्यक्त होत आहे.

दोघांनी आयुष्य संपवण्याचं ठरवलं, लॉजवर गेले... फास लावला पण... त्याचं काय झालं? त्या घटनेने जळगावात हळहळ
जळगावमध्ये काय घडलं ?
| Updated on: May 29, 2026 | 2:57 PM
Share

जळगावमधून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. दोघा प्रेमी युगुलांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दोघेही लॉजवर गेले. दोघांनी गळ्याला फंदा लावला. पण फास तुटल्याने मुलगी वाचली. पण मुलगा वाचू शकला नाही. त्याला रुग्णालयात नेलं असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. या तरुणांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय का घेतला? याचाही तपास घेतला जात आहे.

पाचोऱ्याच्या गोराडखेडे रोडवरील एका लॉजमध्ये ही घटना घडली आहे. रवींद्र संजय मोरे असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. रवींद्रच्या कुटुंबीयांनी हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची कसूनच चौकशी करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

रवींद्र मोरेचा विवाह महिन्याभरापूर्वीच ठरला होता. त्याचं लग्न काही दिवसावर आलं होतं. पण त्याचं प्रेम दुसऱ्या मुलीवर होतं. त्यामुळे तो तणावात होता. रवींद्र हा भडगाव तालुक्यातील गिरडचा राहणारा आहे. रवींद्र आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी हे गुरुवारी सकाळी 10 वाजता गोराडखेडे रोडवरच्या लॉजवर आले होते. खोलीत गेल्यावर दोघांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पंख्याला फास लावून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यात रवींद्रचा मृत्यू झाला. तर फास तुटल्याने सुदैवाने अल्पवयीन मुलगी वाचली.

या सर्व प्रकाराने घाबरलेल्या मुलीने लगेचच लॉजमधल्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ रवींद्रला रुग्णालयात नेलं. पण तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रवींद्रचे कुटुंबीय तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी या सर्व प्रकारावर संशय व्यक्त केला आहे. हा घातपात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराने मुलगी प्रचंड घाबरलेली असून तिने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. या मुलीच्या प्रतिक्रियेनंतरच प्रकरणाची दुसरी बाजू समोर येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल