टेस्ट ट्युब बेबीची वेळ कधी येते, जर…गोकुळच्या राजकारणावरून जयंत पाटील बोचरा वार, महायुतीवर जोरदार टीका!

सत्ताधारी पक्षाला त्यांचे बारा आत गेले, की काय करतील याची खात्री नाही म्हणून ते पाठवत नाहीत. परंतू लोकशाहीमध्ये असे करणे बरे नाही, रेटारेटी करणे योग्य नाही, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखील संघ चांगला काम करेल त्यांना संधी द्या असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

टेस्ट ट्युब बेबीची वेळ कधी येते, जर...गोकुळच्या राजकारणावरून जयंत पाटील बोचरा वार, महायुतीवर जोरदार टीका!
JAYANT PATIL
| Updated on: Nov 09, 2026 | 5:01 PM

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरुन कोल्हापूरात राजकारण पेटले आहे. कोल्हापूरात मागच्या दाराने कायदा बदलून गोकूळ दूध संघात शिरकाव करण्याच्या सरकारच्या मनोवृत्तीला विरोध करण्यासाठी आज कोल्हापूरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला असून या मोर्चाला मार्गदर्शन करताना माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या संपूर्ण संघर्षात एकटे बंटी पाटील लढत होते आणि लढणाऱ्याच्या मागे कोल्हापूर जिल्हा कायम उभा राहीला आहे. हा इतिहास आहे असे जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

 

Loading...

जयंत पाटील यावेळी म्हणाले की गोकूळ दूध संघात सत्ताधारी पॅनलचा पराभव होऊनही आता चार स्वीकृत संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे पाप केले जात आहे. पूर्वी दोन तज्ज्ञ स्वीकृत संचालक निवडून देण्याचा शिरस्ता होता. हॉलमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ही पद्धत होती. परंतू , सतेज पाटलांचे बहुमत मोडून काढण्यासाठी चार स्विकृत संचालक नेमले गेले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे पाप करण्यात आले. फडणवीस यांना संशयाचा फायदा देता येतो. पण, फडणवीसांची जरी इच्छा नसली तरी त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळांने नोटीफिकेशन काढण्याचा निर्णय घेतला आहे असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हणाले.

सत्ताधारी माणसाला काटा जरी टोचला तरी कोर्ट लगेच निर्णय घेते

अन्याय किती करायचा याला काही मर्यादा असतात. येथे मशालचे काही नेते आणि कार्यकर्ते येथे आहेत. त्यांच्या आमदारांचे प्रकरण कोर्टात गेले. त्यानंतर निवडणूक झाली आणि ते पुन्हा नव्याने निवडून आले. पण सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टाला वेळ नाही, सत्ताधारी माणसाला काटा जरी टोचला तरी कोर्ट लगेच निर्णय घेते अशीही टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली. या संघर्षात एकटे बंटी पाटील लढत होते.लढणाऱ्याच्या मागे कोल्हापूर जिल्हा कायम उभा राहीला आहे.हा इतिहास आहे. बॅलेटच्या बॉक्सवर मतदान घेतले तर लोकांचा कौल कळतो. आत येथे तुमची संख्या भरत नाही या सबबीवर निवडणूक लांबवता येणार नाही. इथे खूप लोकं जमले आहेत. कोही लोकं झाडांवर देखील जमले आहेत.मी बंटी पाटलांचे अभिनंदन करेनच करेन असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

येथे पोस्ट वाचा –

होत नसेल तर टेस्ट ट्युब बेबी

सत्ताधारी पक्षाला त्यांचे बारा आत गेले, की काय करतील याची खात्री नाही म्हणून ते पाठवत नाहीत. परंतू लोकशाहीमध्ये असे करणे बरे नाही, रेटारेटी करणे योग्य नाही. टेस्ट ट्युब बेबीचा कधी वापर करतात ? जर होत नसल्यावर टेस्ट ट्युब बेबीची वेळ येते ना. माझी सरकारला विनंती आहे की ही टेस्ट टयुब बेबी मागे घ्यावी. हा अध्यादेश मागे घ्यावा असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us