भोजलिंग डोंगरावरुन 200 फूट दरीत जीप कोसळली, तिघांचा मृत्यू 12 जखमी

सातारा: देवदर्शन घेऊन परत येत असताना भोजलिंग डोंगरावरुन 200 फूट खोल दरीत जीप कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी आहेत. माण तालुक्यातील म्हसवडजवळ हा अपघात झाला.म्हसवडपासून 13 किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावानजीक डोंगरमाथ्यावर भोजलिंग हे देवस्थान आहे. या मंदिरात दर्शन करुन डोंगर उतारावरुन खाली येत असताना, …

, भोजलिंग डोंगरावरुन 200 फूट दरीत जीप कोसळली, तिघांचा मृत्यू 12 जखमी

सातारा: देवदर्शन घेऊन परत येत असताना भोजलिंग डोंगरावरुन 200 फूट खोल दरीत जीप कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी आहेत. माण तालुक्यातील म्हसवडजवळ हा अपघात झाला.म्हसवडपासून 13 किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावानजीक डोंगरमाथ्यावर भोजलिंग हे देवस्थान आहे. या मंदिरात दर्शन करुन डोंगर उतारावरुन खाली येत असताना, जीप चालकाचा ताबा सुटून जीप तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली.

, भोजलिंग डोंगरावरुन 200 फूट दरीत जीप कोसळली, तिघांचा मृत्यू 12 जखमी

यामध्ये तीन महिला जागीच ठार झाल्या तर 12 जण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

भोजलिंगाच्या दर्शनासाठी आलेले हे भाविक विठलापूर ता. आटपाडी जिल्हा सांगली येथील आहेत. जखमींना म्हसवडच्या ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात इतका भीषण होता की जीप क्षणार्थात दरीत कोसळली. नेमकं काय होतंय हे कुणालाच समजलं नाही.  या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *