कर्नाटकातील DYSP ने 5 लाखाची लाच घेण्यासाठी सोलापुरात हवालदार पाठवला, दोघेही सापडले

कर्नाटकातील डीवायएसपीने 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटकातील काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर खून प्रकरणातील साक्षीदारांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ही लाच मागितली होती.

कर्नाटकातील DYSP ने 5 लाखाची लाच घेण्यासाठी सोलापुरात हवालदार पाठवला, दोघेही सापडले

सोलापूर : कर्नाटकातील डीवायएसपीने 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटकातील काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर खून प्रकरणातील साक्षीदारांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ही लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती 1 लाख 50 हजार रुपये घेण्याचे कबुल करण्यात आले. त्यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये लाच स्वीकारण्यात येत होती. लाच स्वीकारणाऱ्या विजापूरचा एक पोलीस आणि खासगी इसमास सोलापूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलं.

लाचेची रक्कम मागणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी महेश्वर गौड पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मे महिन्यात विजापूर येथील काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूरची हत्या झाली होती. याप्रकरणी सोलापूर शहराचे एआयएमआयचे अध्यक्ष तौफीक शेख कर्नाटकात तुरुंगात हवा खात आहे. याच प्रकरणात कर्नाटक पोलिसांचा आणखी एका व्यक्तीवर संशय होता. संबंधित संशयिताला आरोपी न करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक महेश्वर गौड पाटील यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.

या लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारण्यासाठी गौड पाटील यांच्यावतीने पोलीस हवालदार मल्लिकार्जुन आणि खासगी इसम रियाज कोकटनूर हे सोलापुरात  आले होते. लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

या तिन्ही आरोपींविरोधात सोलापुरातल्या सदर बाझार पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 7 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दोन्ही आरोपींना न्यायालयात हजार केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर डीवायएसपी महेश्वर गौड पाटील यांच्या अटकेसाठी सोलापुरातून पथक रवाना झाले आहे.

संबंधित बातम्या 

काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी एमआयएम नगरसेवकला अटक   

सोलापुरात काँग्रेसच्या महिला नेत्याच्या हत्येने खळबळ 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *