AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतनचं सियावर प्रचंड प्रेम होतं, लग्नाआधीच त्याने… वडिलांनी केला नवा खुलासा

सिया आणि चेतनने एका फेक इन्स्टाग्राम अकाऊंटचा वापर करून केतनला लोहगडवर बोलावलं आणि कट रचून त्याला दरीतून खाली ढकललं, असा पोलिसांनी आरोपपत्रात उल्लेख केला आहे.

केतनचं सियावर प्रचंड प्रेम होतं, लग्नाआधीच त्याने... वडिलांनी केला नवा खुलासा
ketan agrawal murder caseImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 8:53 PM
Share

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनने त्याची होणारी बायको सिया गोयलला वाढदिवसाचं सरप्राईज देण्यासाठी पाठीवर तिचं नाव गोंदवलं होतं. कुटुंबीय लग्न आणि साखरपुड्याच्या तयारीत असतानाच केतनच्या हत्येचा कट रचला गेल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी फेक इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून केतनला लोहगडवर बोलावून त्याला दरीत ढकलल्याचा आरोप आहे.

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर मृत झालेल्या केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितलं की, केतनने त्याची होणारी बायको सिया गोयल हिला वाढदिवसाचं सरप्राईज देण्यासाठी स्वतःच्या पाठीवर तिचं नाव गोंदवून घेतलं होतं. ज्यावेळी केतनच्या खुनाचा कट रचला जात होता, तेव्हा त्याचे कुटुंबीय सियाचा वाढदिवस आणि लग्नाच्या तयारीत मग्न होते. कुटुंबाला सियाच्या डोक्यात काय शिजतंय, याचा अजिबात संशय आला नाही.

विशाल अग्रवाल म्हणाले की, कुटुंबाने सियाला आपली सून म्हणून स्वीकारलं होतं. साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू होती. “खरेदीला गेलो तेव्हा आम्ही सियाच्या पसंतीचे तब्बल २८ ड्रेस आणि १५ सोन्याचे सेट घेतले होते,” असं ते म्हणाले. केतन आणि सियाचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला होता आणि याच वर्षी लग्न होणार होतं. केतनने १९ जूनला महाबळेश्वरमध्ये सियाचा वाढदिवस साजरा करण्याचं खास प्लॅनिंग केलं होतं. पण त्याआधीच होत्याचं नव्हतं झालं.

१८ जूनला लोहगड किल्ल्यावर केतनचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचं भासवण्यात आलं. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याला अटक केली. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, सिया आणि चेतनने एका फेक इन्स्टाग्राम अकाऊंटचा वापर करून केतनला लोहगडवर बोलावलं आणि कट रचून त्याला दरीतून खाली ढकललं. धक्कादायक म्हणजे, याच ठिकाणी याआधीही केतनला मारण्याचा प्रयत्न झाला होता. लेकाच्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या अग्रवाल कुटुंबाला या विश्वासघाताने मोठा मानसिक धक्का बसला आहे

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप