AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत काय केलं ? जाणून घ्या लागू केलेल्या योजना अन् घोषणा

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत काय केलं याची विचारणा होत आहे. 2018 साली राज्याने एसटी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या सुविधा तसेच त्यांचा पगार आणि भत्त्यात केलेली वाढ यांची आकडेवारी आता समोर आली आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत काय केलं ? जाणून घ्या लागू केलेल्या योजना अन् घोषणा
संग्रहित छायाचित्र.
Reporter Hemant Birje
Reporter Hemant Birje | Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 6:05 PM
Share

मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांचे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरतोय. भाजपने याच मुद्द्यावर राज्य सरकारला घेरलंय. एसटी महामंडळाचे कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचे म्हटले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत काय केलं याची विचारणा होत आहे. 2018 साली राज्याने एसटी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या सुविधा तसेच त्यांचा पगार आणि भत्त्यात केलेली वाढ यांची आकडेवारी आता समोर आली आहे.

भत्त्यांमध्ये वाढ, बिनव्याजी कर्ज योजनाचा यांचा समावेश

एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने 2018 साली काही घोषणा केल्या होत्या. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पाल्याचे शिक्षण, वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये वाढ, बिनव्याजी कर्जयोजनचा यांचा समावेश होता. सरकारने कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाचं सूत्र वापरून 2.57 नुसार वेतनवाढ केली होती. एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सवलतीचा पास दोन महिन्यांऐवजी सहा महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च एसटी महामंडळ देणार

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतीबा फुले शिष्यवृत्ती योजनेद्वारे 750 रुपये प्रति महिना देण्याची 2018 साली घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन सराकनरने 22 ते 23 कोटी खर्च करणार असे आश्वासन दिले होते. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक शुल्कासाठी कर्मवीर भाऊराव पाटील अग्रीम बिनव्याजी कर्ज योजना जाहीर करण्याची घोषणा केली होती. पाल्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च एसटी महामंडळ देणार, अशी घोषणादेखील करण्यात आली होती.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यामधली विकृती नष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं रावतेंनी जाहीर केलं होतं. त्यामुळे 2018 साली वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली होती.

 सरकारने कोणते निर्णय घेतले होते ?

हजेरी प्रोत्साहन – 180 रुपयांवरुन 1200 रुपये

धुलाई भत्ता – 50 रुपयांवरुन 100 रुपये

वुलन धुलाई भत्ता – 18 रुपयांवरुन 100 रुपये

रात्री तीन तास काम केल्यास तीन रुपये भत्ता मिळायचा, तो 35 रुपये देण्याची केली होती घोषणा

रात्रपाळी भत्ता चार रुपये होता, तो 75 रुपये देण्याची घोषणा केली होती

जिल्ह्याच्या ठिकाणी 15 रुपये भत्ता होता, तो 100 रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते

2017 मध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती होता?

महाराष्ट्र – 4700 ते 15367 रुपये कर्नाटक- 12400 ते 17520 तेलंगणा – 13070 ते 34490 राजस्थान- 5200 ते 20200 उत्तर प्रदेश- 5200 ते 20200

वाहकांचा (कंडक्टर) पगार

महाराष्ट्र- 4350 ते 14225 रुपये तेलंगणा- 12340 ते 32800 कर्नाटक- 11640 ते 15700 राजस्थान- 5200 ते 20200 उत्तर प्रदेश- 5200 – 20200

इतर बातम्या :

Kisan Andolan News: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंना बारचं परमीट मिळालं; मलिकांकडून वानखेडे कुटुंबाचा आणखी फर्जीवाडा उघड

मलिक दुबई दौऱ्यावर; अतिशय खोचक ट्वीट करून माहिती, ते का म्हणतायत सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे?

Follow Us
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...