धाकधूक वाढली, कोल्हापुरात कोरोना कक्षातील वृद्धाचा मृत्यू, रिपोर्ट येण्यापूर्वी मृत्यूने गाठलं

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय अर्थीत सीपीआरमधील (Kolhapur CPR corona death) कोरोना कक्षातील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

धाकधूक वाढली, कोल्हापुरात कोरोना कक्षातील वृद्धाचा मृत्यू, रिपोर्ट येण्यापूर्वी मृत्यूने गाठलं

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय अर्थीत सीपीआरमधील (Kolhapur CPR corona death) कोरोना कक्षातील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना कक्षातील 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी कोरोना कक्षात मृत्यू झाल्याने, कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. (Kolhapur CPR corona death)

हा रुग्ण हातकणंगले तालुक्यातील होता. या रुग्णाला कोरोना संशयित म्हणून उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवला आहे, मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठलं. हा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. जर त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल, तर कोल्हापूरमध्ये अधिक खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली आहे. पेठ वडगावमधील एक आणि कोल्हापूर शहरातील दोघांचा समावेश आहे. पेठ वडगावमधील महिलेवर सांगलीतील मिरज इथे उपचार सुरू आहेत तर बाकी दोघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोल्हापुरात तिसरा रुग्ण काल रात्री आढळला. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बहिणीलाही कोरोना झाल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झालं. पुण्याहून कोल्हापूरला नातेवाईकाकडे आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या बहिणीला संसर्ग झाल्याने, कोल्हापुरातील कोरोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच

देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतरही ‘कोरोना’ग्रस्तांचे आकडे वाढतानाच दिसत आहेत. महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 215 वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकमध्ये गेल्या बारा तासात नवे रुग्ण सापडले आहेत. (Rise in Maharashtra Corona Patients)

पुण्यात 5, मुंबईत 3, नागपुरात 2, तर कोल्हापूर-नाशिकमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 26 नवे रुग्ण सापडले आहेत.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई94146656225335
पुणे (शहर+ग्रामीण)40180168571127
ठाणे (शहर+ग्रामीण)63778276421705
पालघर 100784967194
रायगड88654174164
रत्नागिरी88461030
सिंधुदुर्ग2622175
सातारा1780102868
सांगली66235018
नाशिक (शहर +ग्रामीण)73164209300
अहमदनगर (शहर+ग्रामीण)89455622
धुळे152386078
जळगाव 60303508353
नंदूरबार 27914911
सोलापूर43132161351
कोल्हापूर 122082220
औरंगाबाद84324304341
जालना108357147
हिंगोली 3422792
परभणी2141035
लातूर 71933635
उस्मानाबाद 39524617
बीड2351185
नांदेड 60625224
अकोला 1876149894
अमरावती 85864037
यवतमाळ 44829114
बुलडाणा 4121616
वाशिम 1951065
नागपूर2034138722
वर्धा 34141
भंडारा162891
गोंदिया 2161563
चंद्रपूर177980
गडचिरोली115711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)202031
एकूण26092414450710482

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 215 वर, मुंबई-पुण्यात रुग्ण वाढतेच   

बॉलिवूड अभिनेत्री ‘कोरोना’ग्रस्तांच्या सेवेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्युटी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *