AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत 156 तर सिंधुदुर्गात 17 रुग्ण

कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे (Konkan Corona Update). रत्नागिरी जिल्ह्यात आज (25 मे) 11 नवे रुग्ण आढळले आहेत.

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत 156 तर सिंधुदुर्गात 17 रुग्ण
| Updated on: May 25, 2020 | 5:30 PM
Share

रत्नागिरी : कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे (Konkan Corona Update). रत्नागिरी जिल्ह्यात आज (25 मे) 11 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 156 वर पोहोचला आहे. कोकणात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने धाकधूक वाढली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 17 वर पोहोचला आहे (Konkan Corona Update).

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहेत. रत्नागिरीत गेल्या 24 तासात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. खेड तालुक्यातील ताले या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई सारख्या रेड झोन परिसरातून शेकडो चाकरमाणी कोकणात आपापल्या गावी गेले. मुंबईहून कोकणात गेलेल्या चाकरमाण्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

दरम्यान, रत्नागिरीत तालुक्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीत तालुक्यात आतापर्यंत 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मंडणगड आणि दापोली तालुक्यात प्रत्येकी 23 रुग्ण, संगमेश्वर आणि खेड तालुक्यात 22 रुग्ण आहेत. गुहागर तालुक्यात 14 रुग्ण, चिपळूण तालुक्यात 10 रुग्ण, राजापूर तालुक्यात 4 रुग्ण आणि लांजा तालुक्यात 2 रुग्ण आढळले आहेत.

दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 मे रोजी 8 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Konkan Corona Cases) आला होता. यात कणकवली 6, वैभववाडी 1 आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर काल (24 मे) आणखी एक नवा रुग्ण आढळला होता.

रत्नागिरीत आतापर्यंत 55 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रत्नागिरीत सध्या 97 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 17 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 12 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!

Thane Corona | कोरोनाची टेस्ट बंधनकारक, पैसे नसल्याने कळवा पालिका रुग्णालयात नोंद, रुग्णालयात जाताना रस्त्यातच प्रसुती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.