AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी… खटाखट पैसे जमा होणार, आदिती तटकरेंनी ट्विट करून सांगितली तारीख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज दिली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी... खटाखट पैसे जमा होणार, आदिती तटकरेंनी ट्विट करून सांगितली तारीख
Ladki Bahin TatkareImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 24, 2026 | 4:04 PM
Share

लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अशातच आता राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज दिली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लाडक्या बहि‍णींना पैसे मिळण्यास सुरुवात

मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.

योजना यापुढेही सुरू राहणार

आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ‘महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.’

लाभार्थी महिलांना केवायसी अपडेट करण्याचे आवाहन

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमुळे गेल्या काही महिन्यांपासून लाडक्या बहि‍णींना हप्ता मिळाला नव्हता, मात्र आता सरकारने जानेवारीचा हप्ता वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांना एक दोन दिवसांमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे. अनेक महिला पात्र आहेत, मात्र त्यांनी केवायसी केली नसल्याने त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आहे. केवायसी अपडेट न केलेल्या महिलांनी तातडीने केवायसी करून घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल