AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, योजनेबाबत घेतला मोठा निर्णय

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, योजनेबाबत घेतला मोठा निर्णय
| Updated on: Dec 16, 2024 | 5:55 PM
Share

ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे आडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी या वर्षी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या योनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतता. या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती, त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबाजावणी सुरू झाली. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हापते जमा झाले आहेत. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हापता अँडव्हास जमा करण्यात आला होता. म्हणजे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाचवेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले. दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे  लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.

जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतुद केली जाईल, ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यात आहे.

आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच  मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी – 1500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थ सहाय्य म्हणून – 1212 कोटी, आणि  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी – 514 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी – 514 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणीसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जातं आहे.

Follow Us
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी