Lalbagcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग उद्या बंद होणार

लालबागच्या राजाच्या(Lalbagcha Raja) चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 वाजता बंद होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या पूर्व तयारीसाठी मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Lalbagcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग उद्या बंद होणार
राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान
Image Credit source: social media
| Updated on: Sep 08, 2022 | 12:26 AM

मुंबई : लालबागच्या राजाच्या(Lalbagcha Raja) चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 वाजता बंद होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या पूर्व तयारीसाठी मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. भर पावसातही गणेश भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी रांग लावल्याचे पहायला मिळाले.

दोन वर्षानंतर यंदा प्रथमच कोणत्याही निर्बंधाशिवाय राज्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच लालबागचा राजा म्हणजे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचा आकर्षण आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी पहायला मिळत आहे. लाखो भाविकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मात्र, अनंत चतुर्थीला अवघे दोन दिवस उरले त्यामुळे लालबागचा राजा दर्शन मिळावं यासाठी अजूनही मोठी गर्दी पहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुमारे दोन ते दीड ते दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

नवसाला पावणारा गणपती

नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. यामुळेच लालबागचा राजा हा मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते.

राजकीय नेते मंडळी तसेच अनेक सेलिब्रिटींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

राजकीय नेते मंडळी तसेच अनेक सेलिब्रिटींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते मंडळी तसेच अनेक सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.  दर्शनासाठी येणारे भक्त लालबागचा राजाला भरभरुन दान करत आहेत.  मंडळात एक कोटीपेक्षाही अधिकची देणगी जमा झाली आहे.