AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या तारीख, वेळ जाहीर करतो… आता ढेकळात बसूनच… लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना ललकारले; प्रतिआंदोलनाचा इशारा

Laxman Hake Protest : जरांगे पाटलांच्या या आंदोलनानंतर ओबासी नेतेही आक्रमक झाले असून अनेकांनी प्रतिआंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आता रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे.

उद्या तारीख, वेळ जाहीर करतो... आता ढेकळात बसूनच... लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना ललकारले; प्रतिआंदोलनाचा इशारा
Laxman Hake NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 30, 2026 | 5:04 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधील शेतात बाज टाकून जरांगे पाटील उन्हामध्ये उपोषणाला बसले आहेत. अशातच आता जरांगे पाटलांच्या या आंदोलनानंतर ओबासी नेतेही आक्रमक झाले असून अनेकांनी प्रतिआंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आता रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. उद्या सकाळी ते आंदोलनाची वेळ आणि तारीख जाहीर करणार आहेत. याबाबत हाके यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

लक्ष्मण हाके यांनी काय म्हटले?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ‘जर मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच राहिले आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का बसणार असेल, तर आम्हीही शांत बसणार नाही. उद्यापासून राज्यभरातील ओबीसी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल. जरांगे बाजेवर बसून आंदोलन करत असतील, तर आम्ही ढेकळात बसून आंदोलन करू. आंदोलनाची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबतची माहिती उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जाईल.’

ओबीसी महासंघाकडूनही आंदोलनाचा इशारा

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘जरांगे पाटील यांचं आजपासून उपोषण सुरू झालं आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ वेट ॲंड वॅाचच्या भूमिकेत आहे. आमच्या आक्षणाला धक्का लागला तर आम्ही रस्त्यावर उतरू. जरांगे पाटील यांना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं काहीही देऊ नका. ओबीसी प्रमाणपत्र देऊन बोगस ओबीसी आमच्यात आले तर आमचा समाज पेटून उठेल’ असं तायवाडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना तायवाडे यांनी म्हटले की, ‘सरकारने ओबीसी मंत्रालयाला मराठा नाव जोडल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. अनेक वर्षांचे प्रयत्न आणि आंदोलनानंतर आम्हाला ओबीसी मंत्रालय मिळालं आहे. राज्य सरकार जरांगे पाटील यांना जो ड्राफ्ट देणार, त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सरकारच्या ड्राफ्टमध्ये आमच्या अधिकारावर गदा येत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही.’

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट