LIVE : मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली

Maharashtra: Wreath laying ceremony of the security personnel who lost their lives in the IED blast attack by Naxals in Gadchiroli, yesterday. pic.twitter.com/BYDYAbX4DJ — ANI (@ANI) May 2, 2019 Bihar: Naxals torch four vehicles engaged in road construction work in Barachatti, Gaya. More details awaited. pic.twitter.com/jFnblAQgsA — ANI (@ANI) May 2, 2019 Gadchiroli: Latest visuals …

LIVE : मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली
Picture

मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात दाखल, मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना मानवंदना

02/05/2019,3:23PM

Picture

पुण्यात रस्त्यावर झाड कोसळले

02/05/2019,3:06PM
Picture

शहिदांच्या कुटुंबाला 25 लाखाची मदत

गडचिरोलीतील शहीद जवानांच्या वारसांना 25 लाखांची मदत, थोड्याच वेळात मुख्यमंत्री घोषणा करणार, शहीद जवानांच्या कुटुंबातील एकाला नोकरी, निवृत्तीच्या कालावधीपर्यंत पगार

02/05/2019,2:27PM
Picture

नक्षलवाद्यांचे बॅनर

गडचिरोली जिल्ह्यातील दादापुरा गावात माओवाद्यांनी बॅनर लावले. ‘जल जंगल जमीन पर आदिवासी जनता का राज है’, आदिवासी के विरोध मे शासन काम कर रहा है, असा उल्लेख करून माओवाद्यांनी अनेक बॅनर लावले. स्फोटानंतर नक्षलवाद्यांकडून ठिकठिकाणी बॅनर लावून गडचिरोलीत रोड, पूल बांधू नका असं म्हटलं आहे. मोदी- फडणवीस यांना विरोध करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. नक्षली कमांडर आणि महिलेच्या हत्येचा निषेध. गडचिरोलीतील कसनासुर चकमकीचा बदला घेण्यात आला आहे. कसनासुर चकमकीत 40 माओवादी एक वर्षा आगोदर ठार झाले होते.

02/05/2019,10:34AM
Picture

पोलीस महासंचालक गडचिरोलीत दाखल

02/05/2019,9:52AM
Picture

चारमिनाराचा एक भाग कोसळला

तेलंगणा: हैदराबादमधील ऐतिहासिक स्मारक चारमिनारच्या खांबांपैकी एक भाग कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही, डागडुजी चालु असताना कोसळला भाग

02/05/2019,9:11AM
Picture

बिहारमध्येही नक्षलवाद्यांकडून चार गाड्यांची जाळपोळ

रस्त्याचे काम सुरु असलेल्या चार गाड्या नक्षलवाद्यांकडून जाळण्यात आल्या आहेत. ही घटना बिहारमधील बाराचट्टी येथे घडली.

02/05/2019,8:21AM

Picture

राणीबागेत होणार नवीन पाहुण्यांचं अगमन

मंगळुरु येथील पिलिकुला प्राणी संग्रहालयातून दोन बिबट्यांचं भायखळा राणीबागेत आगमन. ड्रोगन असे नर बिबट्याचे नाव असून त्याचे वय 2 वर्षे आहे, तर मादी बिबट्याचे नाव पिंटो असून तिचे वय 3 वर्षे आहे. दोन्ही बिबट्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांना काही दिवस वाट पहावी लागेल. दोन महिन्यानंतर या बिबट्यांचं दर्शन मुंबईकरांना होणार आहे

02/05/2019,8:13AM
Picture

मी गडचिरोली येथील C60 टीममध्ये काम करण्याची मागणी केली होती : एन्काऊंटर फेम रवींद्र आंग्रे

मी स्वतःहून पोलीस प्रशासन आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांना भेटून गडचिरोली येथील C60 टीममध्ये काम करण्याची मागणी केली होती. पण पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले. मी नक्षलवाद कमी करण्यासाठी काम केले असते. मी त्या भागाचा अभ्यासही केलेला आहे, असं एन्काऊंटर फेम रवींद्र आंग्रे म्हणाले.

02/05/2019,7:48AM
Picture

गडचिरोलीत सर्च ऑपरेशन सुरु

गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये 15 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांचे मृतहेद ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून नक्षलवाद्यांना उत्तर देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्चिंग आणि कोबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली.

02/05/2019,7:39AM

Picture

नक्षलवाद विरोधात देशातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे : राजनाथ सिंह

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्यावर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “नक्षलवाद विरोधात देशातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, नक्षलवादी हल्ल्याचे राजकारण करु नये”, असं केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

02/05/2019,7:34AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *