राज्यात दोन ठिकाणी अंधाधुंद गोळीबार, पंढरपूरात स्थानिक पदाधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू

राज्यात दोन ठिकाणी गोळीबार झाला आहे. जळगावातील शिवाजी नगर परिसरात महापालिका कर्मचाऱ्याच्या घरावर गोळीबार झाला आहे. तर पंढरपूरात अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात स्थानिक पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

राज्यात दोन ठिकाणी अंधाधुंद गोळीबार, पंढरपूरात स्थानिक पदाधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
crime news
| Updated on: Nov 17, 2026 | 11:42 PM

राज्यात दोन ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर आणि जळगावात गोळीबार झाल्याच्या दोन विविध घटना घडल्या आहेत. यात पंढरपूरातील घटनेत अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या घटनेत जळगावातील शिवाजी नगर परिसरात महापालिका कर्मचाऱ्याच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा तरुणांनी गोळीबार केल्यानंतर तलवारी काढून दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे.

पहिल्या घटनेत पंढरपूरात इसबावी येथील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांच्या राहात्या घराजवळ अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या घटनेत राजाभाऊ भिंगे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लाईफ लाईन हॉस्पिटल दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे. या गोळीबारामागचे कारण समजलेले नाही. या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीच्या शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Loading...

जळगावातील शिवाजी नगर परिसरात महापालिका कर्मचाऱ्याच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा तरुणांनी गोळीबार केल्यानंतर तलवारी काढून दहशत माजवली. एक तरुणासोबत असलेल्या वादातून शिवीगाळ करत घरावर गोळीबार केल्याची माहिती आहे. मनपा कर्मचारी कुटुंबातील महिलेने घरावर गोळीबार झाल्याचे सांगत काही तरुणांनी तलवारी काढत दहशत माजवण्याची माहिती दिली आहे. आपल्या मुलाला दुपारी धमकी दिली होती, त्यातून गोळीबार तसेच तलवारी काढून दहशत माजवली असा आरोप महिलेने केला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

घटनास्थळी एक गोळीची पुंगळी देखील मिळून आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात एका तरुणाच्या हातात तलावर दिसून येत आहे. या प्रकरणात सुदैवाने कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us