AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Narvekar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा का? राहुल नार्वेकर म्हणाले..

Rahul Narvekar : सध्या निवडणूक आयोगातील मतभेदाचा मुद्दा गाजत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर दोन सहआयुक्तांनी आक्षेप घेतले आहेत. त्यावर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलले आहेत.

Rahul Narvekar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा का? राहुल नार्वेकर म्हणाले..
Rahul Narvekar
| Updated on: Sep 24, 2026 | 1:00 PM
Share

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी ते सध्या सुरु असलेल्या वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे बोलले. गणपती बाप्पाकडे काय मागितलं, या प्रश्नावर ते म्हणाले की, “गणपती बाप्पाची कृपा मुंबईकरांवर, देशावर राहिली आहे. तीच कृपा कायम रहावी. बळीराजा संकटात आहे, त्याला चांगले दिवस लवकरात लवकर यावेत. निर्सगाचा लहरीपणा यापुढे तरी लागू होऊ नये अशी प्रार्थना केली आहे” “मला खात्री आहे, आपल्या सर्वांच्या साथीने आणि बाप्पााच्या आशिर्वादाने बळीराजाला ताकद, शक्ती प्राप्त होईल” असं राहुल नार्वेकर म्हणाले. निवडणूक आयोगातील मतभेदांचा मुद्दा सध्या गाजतोय. त्यावरही ते बोलले. “निश्चितपणे अनियमितता असेल तर चौकशी होईल. पण मला वाटतं संवैधानिक संस्थांवर इतक्या सहजासहजी आरोप करणं योग्य नाही, ज्या काय उपायोजना असतील. सत्य पडताळणी करायची असेल तर योग्य स्तरावर होईल”

मुख्य निवडणूक आयुक्तांवर दोन सहआयुक्तांनी आक्षेप घेतलेत. त्यावर सुद्धा राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका मांडली. “एकूणच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती माझ्याकडे नाहीय. ही एक संवैधानिक संस्था आहे. स्वायत्त संस्था आहे. अशा संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या प्रमुखांच्या कार्यपद्धतीबद्दल चर्चा करण अयोग्य राहिलं. कोर्ट आहे, न्याय संस्था आहे, इतर माध्यमातून सत्य पडताळणी करता येऊ शकते. ते होईपर्यंत या विषयावर मोघम बोलणं योग्य राहणार नाही” असं राहुल नार्वेकर म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाले?

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्यावर सुद्धा राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं. “भारताचा निवडणूक आयोग जगप्रसिद्ध आहे. अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. या संस्थेच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी विधानं घातक आहेत. जे काय बरोबर असेल चुकीचं असेल त्याची सत्यपडताळणी होईल. अशी विधानं करुन आपल्या देशातील प्रभावशाली संस्थेची बदनामी करणं योग्य राहणार नाही” असं राहुल नार्वेकर म्हणाले.

एकनाथ शिंदे, अजित पवार हे निवडणूक आयोगामुळे जिंकले असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर राहुल नार्वेकर म्हणाले की, “निवडणूक आयोगामुळे एखादा पक्ष जिंकत नाही, जनतेमुळे जिंकतो. अशा प्रकारचे आरोप करणं दुर्देवी आहे”

Follow Us
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस