Maharashtra Board 10th Result 2026 Declared : मुलीच हुश्शार… दहावीच्या परीक्षांमध्ये मुलींनी मारली बाजी, इतका टक्के निकाल मुलींचाच
Maharashtra Board 10th Result 2026 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे....

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिला. १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. पण यंदाच्या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे.
जेवढ्या मुली बसल्या त्यांची पास होण्याची टक्केवारी ९४.९६ टक्के आहे. तर मुलांची संख्या ८९.५६ टक्के इतकी आहे. निकाळ समोर आल्यानंतर यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारल्याचं चित्र समोर आहे. मुलांपेक्षा मुली अधिक ५.४० टक्क्यांनी पास झाल्या आहेत. ६४ विषयाची परीक्षा घेतली. २० विषयाचा निकाल १०० टक्के लागला.
नेहमीप्रमाणे कोकण विभाग टॉपला आहे. कोकण विभागाची टक्केवारी ९७.६२ टक्के असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजी नगरचा लगला आहे. छत्रपती संभाजी नगरचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८२ हजार २६४ फर्स्ट क्लासमध्ये पास झाले आहे. तर ४ लाख २२ हजार ८९१ प्राविण्यास प्रथम श्रेणीत, ३ लाख ८० हजार ४३७ द्वितीय श्रेणीत, १ लाख ३४ हजार ९३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तर राज्यात ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या चार वर्षातील टक्केवारी पाहिली तर या वर्षी निकाल ९२.०९ टक्के आहे. गेल्या वर्षी ९४.१० टक्के होता, २०२४ मध्ये ९५.८१ टक्के होता.
परीक्षेची ठळक वैशिष्ट्य
आपण परीक्षेचे निकाल लवकर जाहीर व्हावेत आणि 11 वीचे वर्ग लवकर सुरु व्हावेत एवढंच नाही तर, पुरवणी परीक्षा लवकर घेता यावी यासाठी दहावीची परीक्षा आगोदर आयोजित केलेली.
परीक्षांच्या कालावधीमध्ये विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शकांचं निरसण करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावर 10 समोउपदशकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागीय स्तरावर जिल्हानिहाय समोउपदशकांची नियुक्ती करण्यात आली होती.
दहावीसाठी एकून 64 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आलेली. त्याचप्रमाणे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, गुजराती, सिंधी, तेलगू या आठ भाषांमध्ये विद्यार्थांनी नोंदणी केलेली.