Maharashtra News LIVE Update |सातारा जिल्ह्याच्या सीमेवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन, 13 जणांवर गुन्हा दाखल

| Updated on: Jun 14, 2021 | 12:43 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update |सातारा जिल्ह्याच्या सीमेवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन, 13 जणांवर गुन्हा दाखल
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra News LIVE Update

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jun 2021 12:05 AM (IST)

    सातारा जिल्ह्याच्या सीमेवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन, 13 जणांवर गुन्हा दाखल

    सातारा : जिल्ह्याच्या सीमेवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन

    १३ जणांवर गुन्हा दाखल

    शिरवळ पोलिसांकडून दोन वाहनांसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • 13 Jun 2021 09:02 PM (IST)

    नाशिकमध्ये कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा सावळागोंधळ सुरुच, दिवसभरात 510 मृत्यूची नोंद

    नाशिक :

    – नाशिकमध्ये कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा सावळागोंधळ सुरुच – आज तब्बल ५१० मृत्यूची नोंद पोर्टलवर केली गेली – यात नाशिक महापालिका १२२, मालेगाव महापालिका ४ तर नाशिक ग्रामीणच्या ३८४ जणांचा समावेश – याव्यतिरिक्त गेल्या ४८ तासात जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू – कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यात तब्बल ६ हजार ४३० नागरिक दगावले – दुसऱ्या लाटेत सर्व रुग्णालये तसेच आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव होता यासोबतच इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या अडचणी, प्रयोगशाळेतून रुग्णाचा ICMR ID वेळेत प्राप्त न होणे, डेटा एंट्री करणारे अपुरे मनुष्यबळ यामुळे काही रुग्णालयांकडून पोर्टलवर माहिती दिली गेली नाही. – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती

  • 13 Jun 2021 08:03 PM (IST)

    नाल्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याने 3 जणांचा मृत्यू, चंद्रपुरातील राजुरा तालुक्यातील देवाडा येथील घटना

    चंद्रपूर : नाल्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याने 3 जणांचा मृत्यू

    राजुरा तालुक्यातील देवाडा येथील घटना

    मल्लेश शेंडे यांच्या शेतात गावातील काही मजूर मशागतीचे काम करायला गेले होते

    अंदाजे 5 वाजता मुसळधार पाऊस झाल्याने सर्व मजूर ट्रॅक्टरने गावाकडे निघाले

    मात्र शेताजवळील नाल्यात ट्रॅक्टर वाहून गेला

    माधुरी वगणे (27), लक्ष्मी वगणे (7) या मायलेकी तर मल्लेश शेंडे (45) अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, 3 जण बचावले

  • 13 Jun 2021 06:56 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सालेकसा शाखेच्या वतीने 10 रुपये प्रतिलीटरप्रमाणे पेट्रोलचे वाटप

    गोंदिया : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सालेकसा शाखेच्या वतीने  वाढत्या पेट्रोलच्या किमतीच्या निषेधार्थ पेट्रोल वाटण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा निषेध नोंदवत तालुक्यातील जनतेला ₹10 रुपये प्रति लिटर प्रमाणे पेट्रोलचे वाटप करण्यात येईल.

  • 13 Jun 2021 06:54 PM (IST)

    19 जूनपासून मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत राज्यव्यापी दौऱ्यावर

    सांगली - 19 जूनपासून मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत राज्यव्यापी दौऱ्यावर

    शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून  घेणार- सदाभाऊ खोत

  • 13 Jun 2021 06:12 PM (IST)

    आषाढी वारी संदर्भातील निर्णयाला मानाच्या दहा पालखी संस्थानने स्वीकारले

    मुंबई : राज्य सरकारच्या आषाढी वारी संदर्भातील निर्णयाला मानाच्या दहा पालखी संस्थानने तत्वत: मान्य केेल आहे. पण वारकऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी मागणी केली आहे.

    कोरोना संकटामुळे यंदादेखील आषाढी वारी आणि पालखी सोहळा बसमधून काढण्याचा राज्य सरकारचा निर्णय

    राज्य सरकारच्या निर्णयाला दहा मानाच्या पालखी संस्थांकडून मान्यता देण्यात आली आहे.

    एसटीतून पालखी नेण्याच्या निर्णयाला संमती असली तरी वारकऱ्यांचा संख्या वाढवण्याची मागणी पालखी संस्थांनी केली आहे.

    सरकारच्या निर्णयाला संस्थांचा पाठिंबा

  • 13 Jun 2021 05:42 PM (IST)

    कल्याण ग्रामीण भागात नळ पाणी योजना मंजूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न

    ठाणे : कल्याणच्या ग्रामीण नेवाली परिसरात फिरता दवाखाना ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण करताना खासदार एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मलंग पट्टीतील चेक डॅप दुरुस्तीचे काम केले आहे. त्याचबरोबर काही तलाव आहेत. त्यांचे गाळ काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे भूजलस्तर सुधारत आहे. या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरुपी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.

  • 13 Jun 2021 05:21 PM (IST)

    खेड पंचायत समितीमधील शिवसेनेच्या सहा बंडखोर सदस्यांविरोधात अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव

    पुणे - खेड पंचायत समिती मधील शिवसेनेच्या सहा सदस्यांनी सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल केल्याप्रकरणी या सहा सदस्यांवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत यांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, सुनिता सांडभोर, वैशाली जाधव, अमर कांबळे आणि मच्छिंद्र गावडे अशी या पंचायत समिती सदस्यांची नावे आहेत. यांना सात दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

    पक्षाकडून कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून तो संमत झाल्यास या सदस्यांना तीन वर्ष कोणत्याही निवडणुकीत अर्ज दाखल करता येणार नाही. मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. पंचायत समिती सदस्य कार्यकाळ संपताच पक्षाकडून त्यांची हक्कलपट्टी होऊ शकते.

  • 13 Jun 2021 04:24 PM (IST)

    मिरज तालुक्यातील दंडोबाच्या डोंगरात दोन बिबटे, नागरिकांची तुफान गर्दी 

    सांगली -मिरज तालुक्यातील दंडोबाच्या डोंगरात दोन बिबटे

    बिबटे पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी

  • 13 Jun 2021 04:19 PM (IST)

    संकटे कितीही, तरी सोबती तुमचाच, पुर्वेश सरनाईकांच्या आदित्य ठाकरेंना हटके शुभेच्छा

    संकटे कितीही, तरी सोबती तुमचाच, पुर्वेश सरनाईकांच्या आदित्य ठाकरेंना हटके शुभेच्छा

    गेले अनेक महिने सरनाईक ईडीच्या रडारवर

    आज आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास

    शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गेले अनेक महिने नाॅटरिचेबल

    प्रताप सरनाईक पक्ष सोडण्याच्याही सुरु होत्या चर्चा

  • 13 Jun 2021 03:34 PM (IST)

    गुजराती भाषेमध्ये आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा, होर्डिंग हटवण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी

    मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त मुंबईच्या कांदेवली मोरारजी मिल कंपाऊंड इथं गुजराती भाषेमध्ये शुभेच्छा देणारे होर्डिंग लावले आहेत. परभाषेतील फलकावर कारवाई करा अशी मागणी मराठी एकीकरण समितीने ट्विटरच्या माध्यमातून केलीय. या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मराठी एकीकरण समितीने ट्विटरच्या माध्यमातून मागणी केली आहे.

  • 13 Jun 2021 01:01 PM (IST)

    शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहील, इथं वाटाघाटी नाही: संजय राऊत यांचं वक्तव्य

    कोविडच्या काळात फिरता आलं नाही, बंधन होती,तरी राजकारण थांबत नाही - पक्षाची बांधणी करणं आमचं कर्तव्य

    - आगामी काळात, कोणत्या दिशेने जायच आहे - त्यानुसार काम सुरू आहे - संघटनेला गती मिळण्यासाठी हा दौरा

    - उत्तर महाराष्ट्रच योगदान महत्वाचं आहे - आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्र साथ गरजेची

    - शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला

    - पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही - जबाबदारी म्हणून काम करावं - आमचे सर्व लोक चांगलं काम करतात

    - आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होतय

    पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही - जबाबदारी म्हणून काम करावं - आमचे सर्व लोक चांगलं काम करतात आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होतय अनुभवी लोकांची समिती स्थापन करू, महाराष्ट्रातील राजकारणी आपण आहोत संस्कार आहेत, - शत्रुत्व टोकाचं नसत - राजकारणात मतभेद असतात - चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या - वाघाच्या मिशीला हात हिम्मत नाही शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहील - इथं वाटाघाटी नाही - अशी माझी कमेंटमेंट आमच्या मनात संभ्रम नाही - या राज्याच मुखमंत्री पद शिवसेनेकडे राहील

    - त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या - अनेक कार्यकर्ते सरस असतात - राजकारणात आकांक्षा ठेवा - हे सरकार बनवताना हे पक्ष विलीन झाले नाहीत,सरकार बनवण्यासाठी आम्ही एकत्र

  • 13 Jun 2021 09:07 AM (IST)

    नाशकात जुन्या वाड्यांचा प्रश्न यंदा ही ऐरणीवर, तब्बल 1184 जुने वाडे धोकादायक स्थितीत

    नाशिक - नाशकात जुन्या वाड्यांचा प्रश्न यंदा ही ऐरणीवर - पावसाळ्यात अनेक जुने वाडे बनतात मृत्यूचा सापळा - शहरात तब्बल 1184 जुने वाडे, इमारती धोकादायक असल्याचं सर्वेक्षणात उघड - रहिवाशांना तात्काळ खाली करण्याच्या बजावल्या मनपा ने नोटिसा - वेळेत खाली न केल्यास संबंधितांवर कारवाई करणार मनपा आयुक्त कैलास जाधव यांची माहिती

  • 13 Jun 2021 08:39 AM (IST)

    नाशिक टॅप लावत 14 लाखांची वीज चोरी, दोघांवर गुन्हा दाखल

    नाशिक - टॅप लावत 14 लाखांची वीज चोरी

    - नाशिकच्या वडाळा गाव परिसरातील घटना - दोन संशयितांवर गुन्हा दाखल - वीज चोरीच्या घटनांमध्य होतीये वाढ - महावितरण विभाग ही अलर्ट वर

  • 13 Jun 2021 08:00 AM (IST)

    नाशिक शहरात गॅस पाईपलाईनचे कामामुळे रस्त्याचं खोदकाम, नागरिक संतप्त

    - नाशिक शहरात गॅस पाईपलाईनचे कामामुळे रस्ते खोदल्याने नागरिकांमध्ये संताप - यामुळे दररोज अपघातास मिळतंय निमंत्रण - 3 दिवसात रस्ते बुजवून व्यवस्थित करा मनपा आयुक्त कैलास जाधव यांचे आदेश - पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदून ठेवल्याने पावसात रस्ते बनतात तळे - अपघात झाल्यास पालिकाच जबाबदार राहणार,नागरिकांच मत

  • 13 Jun 2021 07:28 AM (IST)

    हातनुर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडले

    हातनुर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडले

    तापी नदीकाठच्या गावात गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    धरणातून 6534 क्युसेस पाणी सोडण्यात आले

    विदर्भ आणि मध्यप्रदेश येथे झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणी वाढ

  • 13 Jun 2021 06:58 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्या गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

    अहमदनगर

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते प्रा.राम शिंदे यांच्यात भेट झाल्याची चर्चा

    शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अर्धा तास गुप्त बैठक झाल्याच्या चर्चेला उद्यान

    मात्र राम शिंदे यांनी दिला नकार,

    अशी काय भेट झालीच नसल्याची शिंदे यांची माहिती

  • 13 Jun 2021 06:37 AM (IST)

    अकरावी प्रवेशाच्या ‘सीईटीला’आव्हान

    अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ‘आयसीएसई’च्या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

    न्यायालयानेही या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला त्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Published On - Jun 13,2021 6:28 AM

Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.