Maharashtra Live Update : मुंबईत 6 कोटी 4 लाख 20 हजार रुपयांचे ड्रग्स जप्त

| Updated on: Nov 13, 2021 | 3:40 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी.

Maharashtra Live Update : मुंबईत 6 कोटी 4 लाख 20 हजार रुपयांचे ड्रग्स जप्त
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Nov 2021 08:47 PM (IST)

मुंबई 

भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा मुंबईत दाखल

मुंबई भाजपाचं जोरदार शक्ती प्रदर्शन

  • 11 Nov 2021 06:38 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी होणार शस्त्रक्रिया

    सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान HN रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये शस्रक्रिया होणार

    जेष्ठ आर्थो सर्जन डाँक्टर शेखर भोजराज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करणार शस्रक्रिया

  • 11 Nov 2021 06:37 PM (IST)

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड परिसरात क्रिकेट सामना हरलेल्या संघाच्या दोघांकडून विजेत्या संघाच्या खेळाडूला बेदम मारहाण

    - या घटनेत सुवित शेट्टी याला मारहाण केली म्हणून सलमान शेख, समीर पठाण यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    - आरोपी सलमान शेख व समीर पठाण आणि फिर्यादी सुवित शेट्टी यांच्यामध्ये क्रिकेट सामना झाला

    - या सामन्यामध्ये सुमित शेट्टी यांचा संघ जिंकल्यानंतर आरोपी सलमान व समीर हे दोघेही विजेच्या संघाच्या खेळाडूंकडे बॅट घेऊन होत आले

    -त्यामधील आरोपी सलमान शेख याने फिर्यादी सुवित याच्याकडे येऊन शिवीगाळ करीत धमकी देत सुवित शेट्टी याला बॅटने मारहाण केली

    -आरोपी सलमान शेख आणि समीर पठाण हे मारहाण करून फरार झालेत पिंपरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत

  • 11 Nov 2021 06:34 PM (IST)

    नाशिक

    तब्बल चार दिवसांनंतर शिवशाहीची पहिली बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने रवाना

    पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन देऊन देखील बंदोबस्त न मिळाल्याने शिवशाही व्यवस्थापन नाराज

    बंदोबस्ताशिवाय नाशिकहून पुण्याकडे बस रवाना

    20-25 प्रवासी घेऊन बस पुण्याच्या दिशेने

    तर दुसरीकडे मुंबई महामार्ग बस स्थानकावर उभ्या असलेल्या दोन बसची अज्ञातांकडून तोडफोड

    दुचाकीवर आलेल्या अज्ञातांकडून बसवर दगडफेक

    पोलीस घटनास्थळी दाखल

  • 11 Nov 2021 06:24 PM (IST)

    नाशिक

    नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात दोन शिवशाही बसवर दगडफेक

    साडेपाच वाजेची घटना

    मुंबई नाका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल

    दुचाकीवर आलेल्या अज्ञातांकडून दगडफेक

  • 11 Nov 2021 06:20 PM (IST)

    पुणे

    कंगना रानावत विरोधात चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

    राष्ट्रवादीचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी दिली चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार

    कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल

    कंगना राणावत वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • 11 Nov 2021 05:33 PM (IST)

    पुणे

    स्वारगेट आगारात भाजपा कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी,

    खाजगी गाड्या डेपोतून न सोडण्याचं आवाहन,

    पोलीस बंदोबस्तात खाजगी गाड्या डेपोतून सोडणार,

    खाजगी बस वाहतूक संघटनेनं वाहतूक सेवा बंद करूनही खाजगी सेवा सुरू,

    स्वारगेट डेपोत जमले भाजपा कामगार आघाडीचे कार्यकर्ते

  • 11 Nov 2021 05:13 PM (IST)

    यवतमाळ

    डॉ. अशोक पाल हत्या प्रकरण

    डॉ. अशोक पाल याचा मृतदेह त्याच्या गावी जोउनपूर उत्तर प्रदेश येथे रवाना

    आंदोलक डॉक्टरांनी मेणबत्ती लावून वाहिली श्रद्धांजली

    अशोक पालला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दिला इशारा

    आंदोलनस्थळी रुग्णालय प्रशासनातील एकही व्यक्ती उपस्थित नाही

    त्यामुळे विद्यार्थीनि व्यक्त केला रोष

  • 11 Nov 2021 05:12 PM (IST)

    पुण्यातील 0 आणि पुण्याबाहेरील 3 मृत्यू दिवसभरात 75 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ - दिवसभरात 44 रुग्णांना डिस्चार्ज - पुण्यात करोनाबाधीत 0 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 3. -106 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 505077. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 742. - एकूण मृत्यू -9079. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 495256. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5176.

  • 11 Nov 2021 04:59 PM (IST)

    मुंबई

    अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

    6 कोटी 4 लाख 20 हजार रुपयांचे ड्रग्स जप्त

    अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटची कारवाई

    एका परदेशी नागरिकाला अटक

    अटक आरोपीवर याआधीही दाखल आहे ड्रग्स संदर्भात गुन्हे

    ईनुसा गुडविन असे अटक आरोपीचे नाव

    मेथाक्वेलोन असं जप्त केलेल्या ड्रग्सचं नाव

  • 11 Nov 2021 04:58 PM (IST)

    नंदुरबार

    - एसटीच्या संपात सहभागी झालेल्या 28 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई....

    -जिल्ह्यातील नंदुरबार अक्कलकुवा शहादा आणि नवापूर आगारातील एकूण २3 कर्मचाऱ्यांवर कारवाई. ..

    - धुळे विभागीय नियंत्रक कार्यालयातून करण्यात आली कारवाई......

    - नंदुरबार आगारातील 5 शहाद 6 ,अक्कलकुवा 7 नवापूर आगारातील 5 कर्मचाऱ्यांचा समावेश....

    - कर्मचाऱ्यांवरील कारवाईनंतर संघटना आक्रमक ....

  • 11 Nov 2021 04:58 PM (IST)

    जळगाव

    माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र

    नवाब मलिक हे पत्रकार परिषदेत हायड्रोलिक बॉम्ब फोडणार होते

    मात्र इतका फुसका जर हायड्रोजन बॉम्ब असेल तर हायड्रोजन बॉम्ब चिस नाव बदलावे लागेल

    नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले आरोप हे निव्वळ हवेत गोळीबार

    फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आरोपाचा एक तरी कागद नवाब मलिक यांनी दाखवावा

    केवळ आपल्या स्वार्थासाठी नवाब मलिक निरर्थक आरोप करत आहेत

    आर्यन खान किती चांगला व हर्बल तंबाखू किती छान हे सांगण्यापेक्षा नवाब मलिक यांनी आता जनतेकडे लक्ष दिले पाहिजे

  • 11 Nov 2021 04:55 PM (IST)

    नवाब मलिक

    महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर सात एफआयआर आम्ही दाखल केले

    मी अल्पसंख्याक पदाचा चार्ज घेतल्यानंतर वक्फ अॅक्ट नुसार बोर्ड काम करण्यास स्वतंत्र आहे

    कोणी आमच्याकडे तक्रार केलीस त्यावर आम्ही चौकशी समिती नेमू शकतो

    महाराष्ट्रात पहिल्यांदाच दहा सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली

    निवडणुकीद्वारे दोन जणांचे नाव आले होते

    त्यातील एकाची नियुक्ती केली गेली, काही जागा भरायच्या आहेत

    पण पहिल्यांदाच फुलफेज बोर्ड बनलं आहे.

  • 11 Nov 2021 04:51 PM (IST)

    नवाब मलिक

    ईडीद्वारे प्रतिमा मलिन करण्याचं काम होतंय

    ईडीच्या कारवाईला मी घाबरत नाही

  • 11 Nov 2021 04:50 PM (IST)

    नवाब मलिक

    आता जी छापेमारी सुरू आहे. काही चॅनलवाल्यांनी सांगितलं की मलिकच्या घरापर्यंत ईडी येणार आहे. आली तर आम्ही स्वागत करू

    मात्र ताबूत इनाम ट्रस्टप्रकरणी छापेमारी होत आहे

    त्यात पुण्यात एमआयडीसीत पाच हेक्टर 51 आर जमीन अॅक्विजेशन करून ऑफिसरकडे पैसे जमा केले

    इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना 7 कोटीच्या 76 लाख 98 हजार 250 रुपये ताब्याचे पैसे दिले

    मात्र कागदपत्रानुसार 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये हे अॅक्विजेशनचे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होते

    एका बनावट कागदपत्राद्वारे 30-12-20चा दस्ताऐवज वापरून 7 कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपये हे त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये घेतले

    त्यानंतर वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर जी एनओसी त्यांनी दाखल केली

    जे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुण्याचे ज्वॉइंट सीईओ खुसरो यांच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2021 रोजी पुण्याच्या बंड गार्डनमध्ये एफआयआर दाखल केला

    त्यानंतर पाच लोकांना अटक झाली

    त्यात चांद रमजान मुलानी, इम्तियाज महम्मद हुसैन शेख, अॅड कलिम सय्यद, राजगुरू आणि कांबळे आदींना अटक करण्यात आली

  • 11 Nov 2021 04:44 PM (IST)

    नवाब मलिक

    पुण्यात एक ट्रस्टने 5 हेक्टर जमिन संपादित केली

    बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिन संपादित केली

    ईडी माझ्या घरी आली तर मी त्यांचे स्वागत करीन

    आतापर्यंत सात एफआरआय दाखल झाल्या

    जेव्हापासून हा विभाग माझ्याकडे आला तेव्हापासून विभागाचे क्लिनअप सुरु आहे

    संपूर्ण पारदर्शी कारभार करणार

    सात सात महिने वक्फ बोर्डाची मिटिंग होत नव्हती

  • 11 Nov 2021 04:40 PM (IST)

    नवाब मलिक

    पुण्यातील ट्रस्टवर ईडीची छापेमारी

    वक्फ बोर्डच्या कार्यालयावर छापे नाहीत

    नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

  • 11 Nov 2021 04:27 PM (IST)

    थोड्याच वेळात नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

    राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

  • 11 Nov 2021 04:10 PM (IST)

    अनिल परब बाईट

    - बऱ्याच कामगारांना कामावर यायचे आहे. त्यांना संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

    - इतर कामगारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नये. यासंदर्भात पोलीस आणि एसटी अधिका-यांशी चर्चा झालेली आहे

    - भाजपचे कार्यकर्ते कामगारांना अडवण्याचे काम करतायत

    - कामगारांनो तोल जावू देवू नका. आम्ही तुमच्यासोबत आहे. आंदोलनात वेळ वाया घालवू नये. जो अहवाल येईल त्याचे बंधन आम्हा दोघांवर असेल

    - राजकीय आंदोलन करून कर्मचा-यांचा प्रश्न सुटणार नाही

  • 11 Nov 2021 04:02 PM (IST)

    औरंगाबाद

    औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिकाच्या घरी छापा

    बियाणे उत्पादक व्यावसायिक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पद्माकर मुळे यांच्या घरी छापे

    पद्माकर मुळे हे विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आहेत

  • 11 Nov 2021 03:54 PM (IST)

    विजय वडेट्टीवार बाईट 

    - एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे

    - न्यायालयाच्या माध्यमातून संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

    - एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा, प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही

    - एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मधला मार्ग काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु

    - विरोधी पक्षातील नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत आहे

    - विरोधी पक्ष प्रवाशांना वेठीस धरत आहेत, काही राजकीय पक्ष संप चिघळवू पाहत आहेत

    - भाजप सत्तेत होता तेव्हा एसटीचं विलीगीकरण होत नाही असं सांगत होते

    - आता तेच भाजप नेते एसटीच्या विलीगीकरणाची मागणी करत आहे

    - आंदोलन मागे घ्यावं ही विनंती आहे. संपावर सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचे प्रयत्न

    - मागच्या सरकारमध्ये वित्तमंत्र्यांनी शब्द फिरवला आहे, त्यांचा पूर्ण व्हीडीओ आहे. अर्धा व्हिडीओ नाही

    - चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची तयारी आहे

    ……… ॲान नक्षल

    - सुरजागडच्या लोहखनीज खान रद्द करावी, नक्षलवाद्यांनी काही आरोप माझ्यावर केलेय. त्याची चौकशी गृहविभाग करतात. गृह विभागाच्या निदर्शनास ही बाब आणुन दिली

    - सुरजागडच्या लोहखनीज खानीशी त्याच्या सुरु होण्याशी माझा काहीही संबंध नाही

    - एटापल्लीला जे आंदोलन होतं, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही. या प्रकरणाला घेऊन लोह खनीज मालकाशी माझा संबंध नाही. रोजगार निर्माण व्हावा हीच उद्देश

  • 11 Nov 2021 03:35 PM (IST)

    औरंगाबाद 

    औरंगाबादच्या ईडी छापा प्रकरणात नवा खुलासा

    विश्वास नांगरे पाटील यांच्या नातेवाईकांवर पडली ईडीची धाड

    औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिकावर पडली धाड

    बियाणे उत्पादक व्यावसायिक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्याची माहिती

    संबंधित व्यावसायिक विश्वास नांगरे पाटील यांचे जवळचे नातेवाईक असल्याची माहिती

    समीर वानखेडे प्रकरणाचा तपास विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे आल्यानंतर कारवाई

    नबाब मलिक समीर वानखेडेच्या लढाईचे औरंगाबादेत पडसाद उमटल्याची चर्चा

  • 11 Nov 2021 03:34 PM (IST)

    वांद्रे पूर्व कनाकिया पॅरिस इमारतीच्या तळघरात लागलेली आग आटोक्यात

    घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात यश

    या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही

    आग कशी लागली, कधी लागली याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक करत आहेत

  • 11 Nov 2021 03:33 PM (IST)

    पुणे

    मुश्ताक अहमद शेख, वक्फ बोर्डाच्या जमिन प्रकरणातील तक्रारदार

    - 3 नोव्हेंबरला ईडीकडे तक्रार दिली होती - वक्फ बोर्डाच्या मालकीची ही चार हेक्टर जागा एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले आणि या ट्रस्टकडून ही जागा शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली - अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली आणि त्यापोटी शासनाने 9 कोटी 60 लाख रुपये त्या ट्रस्टला दिले - त्यासाठी वक्फ बोर्डाच्या सीईओनी एनओसी दिली होती, त्यामुळे यामधे मोठे लोक सहभागी असू शकतात - मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही पण यामधे मोठे लोक असू शकतात - हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली ही चार हेक्टर जागा आहे - ईडीने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी आहे

  • 11 Nov 2021 03:31 PM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब मुंबई सेंट्रल डेपोमध्ये दाखल

    परिवहन मंत्री अनिल परब मुंबई सेंट्रल डेपोमध्ये दाखल

    मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये परिवहन मंत्र्यांची बैठक

    'महाराष्ट्र वाहतूक भवन' येथे अनिल परब आणि परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक

    गेल्या 1 तासापासून सुरू आहे बैठक

    जे कर्मचारी कामावर येऊ इच्छितात त्यांना संरक्षण देण्याबाबत होऊ शकते चर्चा

  • 11 Nov 2021 03:12 PM (IST)

    यवतमाळ

    डॉ. अशोक पाल मृत्यू प्रकरण

    वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे टाटा अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे यांचा राजीनामा

    वैधकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठवला राजीनामा

    रुग्णालयात डॉक्टरांचा संप आणि एका शिकाऊ डॉक्टरची हत्या झाली होती

  • 11 Nov 2021 02:59 PM (IST)

    सातारा

    सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिवसेनेला नाकारल्याने गृहराज्यमंत्री आक्रमक

    "जिल्ह्यात आम्हालाही मार्ग मोकळे" गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा राष्ट्रवादीला थेट इशारा

  • 11 Nov 2021 02:57 PM (IST)

    नवी दिल्ली

    समीर वानखेडे यांचा पुतण्या रोहित वानखेडे बाईट

    समीर वानखेडे यांचे पुतणे रोहीत वानखेडे यांनी एसटी आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची दिल्लीत भेट घेतली

    नवाब मलिक आमच्या कुटुंबावर रोज आरोप करताहेत

    वाशिम पोलिसांत ॲट्रोसिटी अंतर्गत नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करायला गेलो पण तक्रार घेतली गेली नाही

    पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली

    दलितांवर पूर्वीही अत्याचार करत होते आता पण अत्याचार केला जातोय

    संपला यांनी कागदपत्रे मागितली

    सांपला यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलंय

    खोटे जातीचे प्रमाणपत्र दिल्याचा नवाब मलिकांचा आरोप खोटा आहे

  • 11 Nov 2021 02:53 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमधून  34 कर्मचारी निलंबित 

    गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी दोन आगारात जवळपास 13 दिवसांपासून संप सुरू आहे

    या संपाच्या अकराव्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी 14 कर्मचाऱ्यांना तर काल उशिरा रात्री 34 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश गडचिरोली जिल्ह्यात आज प्राप्त झाले

    आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 48 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोली जिल्ह्यात केली

    राज्यातील अनेक ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली असून एसटी महामंडळाच्या संपावर तोडगा काही निघेना अशी परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची झाली आहे

  • 11 Nov 2021 02:50 PM (IST)

    पुण्यात ईडीची छापेमारी सुरू, सूत्रांची माहिती

    - वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरणी रेड सुरू

    - वक्फ बोर्ड नवाब मलिक यांच्या अंतर्गत येते , 7 ठिकाणी रेड सुरू आहे

    - ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक सततच्या वक्तव्य करत असल्याने ईडीने कारवाई केली आहे.

    - सातत्याने फडणवीसांवर निशाणा साधत असल्याने नवाब मलिक केंद्र सरकारचेया निषाण्यावर…

    - वक्‍क बोर्डाची जमीन बेकायदेशीरपणे विकून पैसे उकळल्याचा नवाब मलिक यांच्यावर आरोप

    - या प्रकरणी पुण्यात यापूर्वीच एफआयआर दाखल

  • 11 Nov 2021 02:49 PM (IST)

    पंढरपूर

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू

    ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना आणि गरोदर माता यांना दर्शन घेता येणार

    कोरोना संसर्गामुळे दर्शन घेण्यास निर्बंध होते

    पण शासन आदेशानुसार पंढरपूर येथे याची अंमलबजावणी सुरू झालीय

  • 11 Nov 2021 02:47 PM (IST)

    अमृता फडणवीस यांची नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस

    - देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस - 48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा. - मानहानीच्या खटल्यासोबतच फौजदारी कारवाईचाही नोटिशीतून इशारा - भादंविच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत कारवाईचा इशारा

  • 11 Nov 2021 01:42 PM (IST)

    सगळ्यांची गैरसोय होतीय, संप मागे घ्या : परिवहन मंत्री अनिल परब

    पहिल्यांदा संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होत आहे. त्यांची जी प्रमुख मागणी आहे कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे स्थापन झालेल्या समितीसमोरच त्यांना त्यांचं म्हणणं मांडावं लागेल. त्यांच्या रिपोर्टवर जी कारवाई करायची ती सरकारला करायची आहे. कोर्टाच्या आदेशाने आम्हाला जसं बंधन आहे. तसंच त्यांनाही बंधन आहे. बाकीच्या ज्या गोष्टी या सर्व मागण्या मी मान्य केल्या आहेत. त्यात पगारवाढीची मागणी सोडून त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. उरलेल्या मागण्यांबाबत चर्चा करायची असेल तर संप मागे घ्यावा लागेल. लोकांची गैरसोय चालू ठेवून सरकार चर्चा करायला तयार आहे. पण ही पद्धत नाही. कोर्टाने बेकायदेशीर ठेवलेला संप आहे

    कालही आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली आहे. काल सदाभाऊ खोत यांना मी सर्व परिस्थिती सांगितली. पण त्यांनी बाहेर जाऊन वेगळंच काही तरी सांगितलं. आजही त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो. उद्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करूया म्हणाले. माझी आजही चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षनेत्यांसोबतही चर्चेची तयारी आहे. माझी चर्चेची दारं खुली आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. हा प्रश्न जेवढा चिघळेल त्यात एसटीचं नुकसान होईल. तुमचंही नुकसान होईल. अतिशय वाईट परिस्थिती असलेल्या एसटीचं आणखी नुकसान होऊ देऊ नका. आपण त्यातून मार्ग काढूया. पण कामगार राजकारणाचे बळी ठरले तर दुर्देव आहे.

    विलनीकरणाची मागणी चार दिवसात होणारी नाही. त्यासाठी पूर्ण अभ्यास करावा लागतो. हे नेत्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे. पण नेते भडकवत असतील तर दुर्देवाने कामगारांचं नुकसान होत आहे.

    समिती कोर्टानेच तयार केली आहे. आम्ही जीआर काढला. त्यात शासकीय लोकं आहेत. त्यामुळे समिती बनली आहे. नव्या मागण्या चुकीच्या पद्धतीने मांडल्या जात आहेत. मी वस्तुस्थिती सांगत आहे. त्यात चुकीचं असेल तर सांगा.. एक दोन दिवसात विलनीकरणाची प्रक्रिया होत नाही. कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कारवाई करू

  • 11 Nov 2021 01:22 PM (IST)

    राजकारण करु नका, जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची पूर्तता करा- सुधीर मुनगंटीवार

    राजकारण करु नका अशी माझी विनंती आहे. महाविकास आघाडीचे नेते शुद्धीवर आहेत, असा माझा विश्वास आहे. भाजपचं ऐकू नका पण तुम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची पूर्तता करा, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • 11 Nov 2021 01:19 PM (IST)

    दीड वर्षात सरकारच्या चुकीमुळे सहा हजार कोटींचा तोटा- मुनगंटीवार

    एसटी महामंडळाच्या बाबतीत एकजरी निर्णय घेतला तरी महामंडळ फायद्यात पडले. दीड वर्षात सरकारच्या चुकीमुळे सहा हजार कोटींचा तोटा झाला. एकीकडे आमचे राज्य एक नंबर असेल असा दावा केला जातो. कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांना जो पगार दिला जातो तो पगार महाराष्ट्रात दिला जात नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार आहे, मग एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करण्याचे कारण काय. हा भेदभाव सरकारने थांबवला पाहिजे.

  • 11 Nov 2021 01:16 PM (IST)

    निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन संग्राम सैनिक म्हणून दर्जा दिला जाईल- सुधीर मुनगंटीवार

    राजकाणात शिमगा का करतायत तुम्ही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासने दिली. पण या जाहीरनाम्यात शपथनामा हा शब्द उपयोगात आणला. ते म्हणताता. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी शपथ घेतली. हा शपथनामा मांडताना शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, असे या जाहीनाम्यात सांगण्यात आले. अर्धवट व्हिडीओ दाखवून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद व्हावा यासाठी काम करताय का. एसटी महामंडळाची प्रचंड अशी संपत्ती आहे. कर्मचाऱ्यांनी लाल रक्त आटवून लाल रंगाची बस लोकांच्या सेवेत सुरु ठेवली. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. तर हे सरकार लोकशाहीच्या माध्यमातून भस्मसात होईल. आमचे सरकार येईल तेव्हा ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल, ज्यांना सेवामुक्त करण्याचा डाव रचला जात आहे त्यांना आंदोलन संग्राम सैनिक म्हणून दर्जा दिला जाईल. तसेच कर्मचाऱ्यांचे जेवढे नुकसान झाली आहे, त्याच्या दुप्पट नुकसान भरपाई दिली जाईल.

  • 11 Nov 2021 01:10 PM (IST)

    जाहिरानाम्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या होत्या- मुनगंटीवार

    जाहिरानाम्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या होत्या. हा जाहीरनामा शुद्धीवर असताना केला होता. एसटी महामडंळाचे अत्याधूनिकीकरण करणार,  सक्षण परिवहन सेवा उभी करणार, शाससनातर्फे अनुदान देणार, नवीन बसेस खरेदी करणार, तसेच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देणार, असं जाहीनाम्यात सांगण्यात आले होते. या जाहीरनाम्यात, फुले, आंबेडकर यांचा फोटो आहे. मग कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत.

  • 11 Nov 2021 01:06 PM (IST)

    युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाला सर्वात जास्त निधी- सुधीर मुनगंटीवार

    भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती तेव्हा एसटी महामंडळाला  या सरकारने सर्वात जास्त निधी दिला होता. त्या काळात सातशे पेक्षा जास्त बसेस खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. मुंबईतील महिलांसाठीच्या तेजस्वीनी नावाच्या बससेस युती सरकारच्या काळातील आहेत. पहिल्या टप्प्यात शंभर पेक्षा जास्त बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी पैसे दिले.

  • 11 Nov 2021 01:03 PM (IST)

    हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा करत आहे, धाक दाखू नका- सुधीर मुनगंटीवार

    भाजप नेते सुधीर मुनगंटीवार माध्यमांशा बोलत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा करण्याचं काम  सरकार करत आहे. माझा सरकारला इशारा आहे. कर्मचाऱ्याला धाक दाखवत असाल तर खबदारस. एसटी कर्मचाऱ्यांना धाक दावखून नका. लोकशाहीत तुम्ही अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. धाक दाखवण्यचा धंदा बंद करा, असे मुनगंटीवार म्हमाले.

  • 11 Nov 2021 12:54 PM (IST)

    पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा

    पंढरपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा

    महाविकास आघाडीला सुबुद्धी द्यावी यासाठी मनसेचे पंढरपुरात श्री विठ्ठलाला साकडे

    नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाच्या मूर्तीला मनसेकडून अभिषेक

    मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे श्री विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन

  • 11 Nov 2021 12:35 PM (IST)

    डॉक्टर अशोक पाल हत्याप्रकरण, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याविरोधात घोषणाबाजी

    यवतमाळ- डॉक्टर अशोक पाल हत्याप्रकरण

    आंदोलक शिकाऊ डॉक्टरांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा पुतळा जाळून केले आंदोलन

    जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याविरोधात घोषणाबाजी

  • 11 Nov 2021 12:15 PM (IST)

    भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृत्यू, चंदनखेडा-वायगाव रोडवरील शेतात आढळला मृतदेह 

    चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृत्यू

    चंदनखेडा-वायगाव रोडवरील एका शेतात आढळला मृतदेह

    मयत वाघीण अंदाजे 3 वर्षांची असण्याची आणि हा मृत्यू शेतातील कुंपणात लावलेल्या करंटमुळे झाल्याची शक्यता

    वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे

  • 11 Nov 2021 11:53 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

    एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ 'राज'दरबारी पोहोचलं,

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

    एस टी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंना आपल्या व्यथा सांगत आहेत आधी आत्महत्या थांबवा, आत्महत्या करणाऱ्यांचं मी नेतृत्व करत नाही- राज ठाकरे विलिनीकरण लागू होणारच नाही, आयोग लागू करुन द्या, पगार वाढू द्या, दिवाळी साजरी केली नाही, आमची दिवाळी रस्त्यावर झालीय- एस टी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ पुढाऱ्याने राज ठाकरेंसमोर व्यथा मांडल्या

  • 11 Nov 2021 11:51 AM (IST)

    शिवाजीनगर एसटी स्थानकावरील कर्मचाऱ्यांचे विश्रामगृह केले बंद

    पुणे : शिवाजीनगर एसटी स्थानकावरील कर्मचाऱ्यांचे विश्रामगृह केले बंद

    कर्मचाऱ्यांना सामान बाहेर काढायला लावलं

  • 11 Nov 2021 11:27 AM (IST)

    बैलगाडा शर्यती प्रकरणी सरकार सुप्रीम कोर्टात, याचिका ऐकायला कोर्ट तयार

    बैलगाडा शर्यती प्रकरणी सरकार सुप्रीम कोर्टात

    बंदी हटवण्याबाबत महाराष्ट्र सरकारची याचिका ऐकायला सुप्रीम कोर्ट तयार

    येत्या सोमवारी होणार प्रकरणाची सुनावणी

  • 11 Nov 2021 11:25 AM (IST)

    पुतळे जाळत असाल तर जाळा, मी आरसा दाखवतोय- नवाब मलिक

    आमची लढाई कोणा व्यक्तीविरोधात नाही. वाईट कामांचा पर्दाफाश करण्याचे माझे काम आहे. माझे पुतळे जाळत असाल तर जाळा. पण मी तुम्हाला आरसा दाखवत आहे. आरसा दाखवत असेल तर तुम्ही का घाबरत आहात. भाजपचे नेते सर्वांना साप, कुत्रे, डुक्कर, अशी उपाधी देत आहेत. हे माणसांना माणूस म्हणून पाहत नाहीत. त्याची यातून मानसिकता सजमते. लोकांना त्यांची मानसिकता समजते.

  • 11 Nov 2021 11:23 AM (IST)

    ड्रग्जचा खेळ करणारे गुजरातमध्ये अड्डा बनवून बसलेत, ड्रग्जच्या मागे कोण, याचा खुलासा करावा- मलिक

    ड्रग्जचा खेळ करणारे गुजरातमध्ये अड्डा बनवून बसलेत ड्रग्जच्या मागे कोण, याचा खुलासा करावा एनसीबी आणि एनआयएने कारवाई करावी

    द्वारकात साडेतीनशे कोटीचे ड्रग्ज पकडले आहे. मनिष आणि धवल भानुशाली केपी गोसावी सुनील पाटील हे सर्व जण अहमदाबादच्या नोवाटल आणि फाईव्ह स्टार हॉटेलात होते. ते गुजरातच्या मंत्र्यासोबत त्यांचे फोटो आहे. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही. महाराष्ट्रात दोन ग्राम ड्रग्जमुळे परेड केली आहे. या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने व्हावी. यात कोणत्या पक्षाचा नेता आणि कार्यकर्ता आहे याकडे दुर्लक्ष करून एनसीबी आणि एनआयएने चौकशी करावी. देशाला नशामुक्त करण्यासाठीच १९५०चा कायदा बनवला होता

    गुजरातमधूनच सर्व खेप येत आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी. गुजरात कनेक्शन काय आहे ते समोर यावं- नवाब मलिक

  • 11 Nov 2021 11:19 AM (IST)

    सागरमार्गे गुजरातच्या माध्यमातूनन ड्रग्ज पसरवण्याचे काम सुरु- मलिक

    कोण किती मोठा आहे, राजकीय नेता आहे हे न पाहता कारवाई झाली पाहीजे. सागरमार्गे गुजरातच्या माध्यमातूनन ड्रग्ज पसरवण्याचे काम सुरु आहे. हे कोणाच्या माध्यमातून केले जात आहे याचा तापस करावा. एनसीबीचे प्रचारतंत्र सर्वांचे लक्ष फिल्म अभिनेत्यांकडे वळवण्याचे आहे. पण गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले. त्याची चौकशी व्हावी.

  • 11 Nov 2021 11:16 AM (IST)

    शब्द परत घेतले नाही, क्षमा मागितली नाही तर मानहानीचा दावा ठोकणार- नवाब मलिक

    नवाब मलिक माध्यमांशी बोलत आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी माझ्या जावयाकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगितले आहे. पण माझ्या जावयाच्या घरात कोणताही ड्रग्ज सापडलेला नाही, असे पंचनाम्यात स्पष्टपणे सांण्यात आले आहे. परवा पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी पुन्हा उल्लेख केला. माझ्या मुलगी फडणवीस यांना नोटीस जारी करणार असल्याचे सांगितले होते. तर आज फडणवीस यांना  नोटीस पाठवलेली आहे. फडणवीस यांनी क्षमा मागितली नाही, तसेच शब्द वापस घेतले नाही, तर त्यांच्याविरोधात मानहाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल.

  • 11 Nov 2021 11:15 AM (IST)

    ड्रग्जचा खेळ गुजरातमधूनच तर सुरु झाला नाही ना?, मलिकांना संशय

    ड्रग्जचा खेळ गुजरातमधूनच तर सुरु झाला नाही ना? या ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा, ही अपेक्षा फडणवीसांनी माझ्या मुलीवर, जावयावर आरोप केले माझी मुलगी निलोफर मलिक यांची देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस जर देवेंद्रजींनी माफी मागितली नाही, विधाने मागे घेतली नाही, तर आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार

  • 11 Nov 2021 11:08 AM (IST)

    विदेशातून कांदा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचा विरोध, शेतकरी संघटना आक्रमक

    लासलगाव- विदेशातून कांदा आयात करणाऱ्या व्यापारी आणि आडत्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

    - कांदा आयात करणाऱ्या व्यापारी आणि आडत्यांना कांदा न देण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

    - विदेशातून कांदा आयात करणाऱ्या व्यापारी आणि आडत्यांचा शोध घेऊन तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा

  • 11 Nov 2021 10:44 AM (IST)

    कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवला

    कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवला

    खासगी गाड्या मध्यवर्ती बसस्थानकात घेतल्या जाण्याची शक्यता

    खासगी बस बसस्थानकात आणायला एसटी कर्मचाऱ्यांकडून होऊ शकतो विरोध

    या पार्श्वभूमीवर वाढवला पोलिस बंदोबस्त

    एसटी आंदोलक कर्मचारी आणि पोलिसांनाच स्थानकात दिला जातोय प्रवेश

  • 11 Nov 2021 10:31 AM (IST)

    संजय राऊत काय म्हणाले?

    आम्ही कुसुमाग्रज वाचतो, वसंत कानिटकर यांचं साहित्य वाचतो. कधी कधी बर्नाड शॉ चाळत असतो. यावेळेचं नाशिकला होणार साहित्य संमेलन चांगल होईल. चिखलात कोण लोळतंय, चिखलात लोळायला कुणी सुरुवात केली हे महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळानं नवाब मलिक यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, हे सगळं सुरु आहे त्याकडे देशातून पाहिलं जातं. त्यामुळे किती काळ चालणार हे मी म्हणालो. मात्र, शेवटी सत्याचाच विजय होतो, असं संजय राऊत म्हणाले.

    कामगारांना कुठंही जाण्याचा अधिकार असतो. महाराष्ट्र सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. कामगारांनी एसटी कर्मचारी, महाराष्ट्रातील जनता यांचं हित पाहून राजकीय नेत्यांच्या मागं न लागता विचार करावा. राजकीय नेत्यांना कामगारांचे प्रश्न सुटावेत असं वाटत नाही. एसटी महामंडळ सरकारमध्ये विलिनीकरण करावं, अशी मागणी आहे. सुधीर मुनंगटीवार अर्थमंत्री असतानाचा विलिनीकरण शक्य नसल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज्यातील सरकार कामगारांच्या पाठिशी असलं तरी सरकारवर काही बंधन आहेत.

    भाजपला महाराष्ट्राला चूड लावायची आहे. राज्याच्या स्थिरतेला आणि शांततेला चूड लावयाची आहे.कामगारांच्या घरांच्या होळ्याकरुन भाजपवाले हे करत असतील तर कामगारांनी यातून बाहेर पडलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

  • 11 Nov 2021 09:59 AM (IST)

    पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या, औरंगाबादेतील हत्येचे गूढ उकलले 

    औरंगाबाद : त्या आठ वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूचे गूढ उकलले

    पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या

    9 नोव्हेंबर रोजी छोट्या मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला होता

    दगडू पाचे असे पोटच्या मुलीची हत्या करणाऱ्या क्रूर बापाचे नाव

    करमाड पोलिसांनी पित्याला गजाआड केले असून त्याने आपल्याच मुलीची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे

  • 11 Nov 2021 09:46 AM (IST)

    यवतमाळ शिकाऊ डॉक्टर अशोक पाल हत्या प्रकरण, डॉक्टरांकडून धरणे आंदोलन, आरोग्य यंत्रणा ठप्प

    यवतमाळ- वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय येथील शिकाऊ डॉक्टर अशोक पाल हत्या प्रकरण

    महाविद्यालयाचे रुग्णालयाचे सर्व गेट केले शिकाऊ डॉक्टरांनी केले बंद

    महाविद्यालयाच्या गेटवर डॉक्टरांकडून धरणे आंदोलन

    डीन, यवतमाळ पोलिसांविरोधात घोषणाबाजी

    रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ठप्प

  • 11 Nov 2021 09:36 AM (IST)

    नाशकात मेडिकलमध्ये तोडफोड करणाऱ्या संशयिताला नागरिकांनी पोलिसांसमोर दिला चोप

    नाशिक - मेडिकलमध्ये तोडफोड करणाऱ्या संशयिताला नागरिकांनी पोलिसांसमोर दिला चोप

    नाशिकच्या कामाटवाडा परिसरातील घटना

    नागरिकांच्या मारहाणीत संशयित गंभीर जखमी

    सुरवातीला संशयिताने दमबाजी करत मेडिकलमध्ये केली होती तोडफोड

    तोडफोड करण्याचे कारण मात्र अस्पष्ट

    अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

  • 11 Nov 2021 09:09 AM (IST)

    सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभेत शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये राडा

    जिओने शहरात खोदलेले खड्डे, काही वार्डात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न आदी अनेक विषयावर नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी पालिका सभेत शिवसेना आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधे बाचाबाची होऊन नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

  • 11 Nov 2021 09:07 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पिंपरी चिंचवड आणि मावळ भागात सक्रिय

    -मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे ; पार्थ पवार यांचे ट्वीट

    -मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे ; पार्थ पवार यांचे ट्वीट

    -‘मावळातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुख्य बाजारात विक्रीसाठी येताना अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होत आहे. अपघात वाढले आहेत. पवन-अंदर मावळातील अशा प्रश्नांसाठी डीपीडीसी फंडातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे. मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे.’

  • 11 Nov 2021 09:06 AM (IST)

    सोलापुरात सलग चौथ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, बसस्थानक पडले ओस

    सोलापूर - सलग चौथ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू

    सोलापूर बसस्थानक पडले ओस

    रोजच्या 350 हून अधिक बसच्या फेऱ्या रद्द

    लोकांना घ्यावा लागत आहे खासगी वाहतुकीचा आधार

  • 11 Nov 2021 07:19 AM (IST)

    ईडीने नागपुरातील ‘एम्प्रेस मॅाल’ घेतला ताब्यात, 500 कोटींची संपती ताब्यात घेण्यासाठी कारवाई

    नागपूर : ईडीने नागपुरातील ‘एम्प्रेस मॅाल’ घेतला ताब्यात

    - 725कोटी रुपये कर्ज बुडवल्याचं प्रकरण

    - ईडीने अडीच वर्षांपूर्वी अटॅच केला होता ‘एम्प्रेस मॅाल‘

    - ‘पीएमपीएल’ नुसार 500 कोटींची संपती ताब्यात घेण्यासाठी कारवाई

    - ‘एम्प्रेस मॅाल’ची मालकी मुंबईच्या केएसएल इंडस्ट्रीजची आहे

    - 2016 मध्ये घोटाळा समोर आल्यावर ईडीने केएसएल कंपनीवर दाखल केला होता गुन्हा

  • 11 Nov 2021 06:34 AM (IST)

    यवतमाळमध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ डॉक्टरची हत्या

    यवतमाळ- यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या

    वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या

    डॉ अशोक पाल असे विद्यार्थ्यांचे नाव

    हत्येचे कारण अस्पस्ट, पोलीस घटनास्थळी दाखल

    रुग्णालय परिसरात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन

  • Published On - Nov 11,2021 6:27 AM

    Follow us
    2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
    2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
    मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
    मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
    बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
    बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
    म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
    म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
    मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
    मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
    हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
    हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
    राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
    राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
    दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
    दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
    पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
    पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
    हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
    हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.