Maharashtra News LIVE Update | नागपुरात कलम 144 लागू, 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्रित येण्यास मनाई

| Updated on: Nov 15, 2021 | 12:40 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नागपुरात कलम 144 लागू, 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्रित येण्यास मनाई
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Nov 2021 10:14 PM (IST)

    नागपुरात कलम 144 लागू, 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्रित येण्यास मनाई

    नागपूर : नागपुरात कलम 144(1) लागू

    आज रात्री 12 वाजेपासून कलम 144 (1) लागू

    अमरावती आणि इतर शहरात घडलेल्या घटनेचे पडसाद नागपुरात उमटू नये यासाठी घेण्यात आला निर्णय

    शहरात शांतता राहावी म्हणून आरोग्याच्या कारणाव्यतिरिक्त 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्रित येण्यास मनाई

  • 14 Nov 2021 08:11 PM (IST)

    पंढरपूर शहरासह परिसरात पावासाला सुरुवात, विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली धांदल

    पंढरपूर : शहर व परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात

    पंढरपूर शहरात धुवादार पाऊस

    कार्तिक यात्रेमुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली धांदल

    फुटपाथवर बसलेल्या व्यापारांचे अचानक आलेल्या पावसामुळे झाले नुकसान

  • 14 Nov 2021 08:09 PM (IST)

    मनमाड-नांदगाव मार्गावर ईनोव्हा-ट्रॅक्टरची समोरासमोर धडक, 6 जण गंभीर जखमी

    मनमाड : मनमाड-नांदगाव मार्गावर ईनोव्हा-ट्रॅक्टरची समोरासमोर धडक

    भीषण अपघातातात 6 जण गंभीर जखमी

    अपघात इतका भीषण की कारचा झाला चक्काचूर तर ट्रॅक्टर फेकला गेला खड्ड्यात

  • 14 Nov 2021 07:19 PM (IST)

    करुणा शर्मा यांनी घेतली आझाद मैदानातील एसटी कामगारांची भेट

    मुंबई : काही दिवसांपासून एसटी कामगारांनी आजाद मैदानामध्ये आंदोलन सुरू केले आहे. आज करुणा शर्मा यांनी या कामगारांना भेट दिली.  आमच्याकडे शंभर-दीडशेपेक्षा जास्त एसएमएस मेसेज आणि लेटर दिलेले आहेत. त्याच्यासाठी मी आज भेट देण्यासाठी आले आहे, असे करुणा शर्मा यांनी सांगितले.

  • 14 Nov 2021 07:11 PM (IST)

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; तीन दिवसांपासून उपचार सुरू

    मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय.

    तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • 14 Nov 2021 05:50 PM (IST)

    26 नक्षल्यांचा ठार केलं, 100 पेक्षा जास्त नक्षलवादी असल्याचां संशय- गडचिरोली पोलीस

    नक्षलवादविरोधी पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केलं. त्यांनंतर आता पोलीस माध्यमांशी संवाद साधत आहेत. नक्षलवाद्यांच्या घरच्यांना त्यांचे मृतदेह सोपवले जातील, तेलतुंबडे याच्यावर इतर राज्यातील पोलिसांनीदेखील बक्षीस जाहीर केलेलं होतं. आम्ही राबवलेल्या मोहिमेवेळी 100 पेक्षा जास्त नक्षलवादी असल्याचां संशय आहे. तेलतुंबडे गेल्यानंतर नक्षल चवळवळीला मोठे नुकसान झाले. ठार करण्यात आलेले सगळेच नक्षल वर्दीमध्ये होते. साध्या वेशात कोणीही नाही. त्या ठिकाणाहून बरेच सामान आणि साहित्य जप्त करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या लक्षलवाद्यांची संख्या वाढली आहे.

  • 14 Nov 2021 05:18 PM (IST)

    एसटीचे कर्मचारी कामावर परतायला सुरुवात, महामंडळाची माहिती

    पुणे : राज्यभरात एसटीचे कर्मचारी कामावर परतायला सुरुवात

    आज दिवसभरात विविध आगारांत 821 कर्मचारी कामावर परतल्याची महामंडळाची माहिती

    काल 3 हजार 166 कर्मचारी कामावर होते, तर आज 3 हजार 987 कर्मचाऱ्यांची हजेरी पटलावर नोंद

    महामंडळाकडून एसटीचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न ? की कर्मचारी स्वतःहून कामावर परतायला लागले

  • 14 Nov 2021 05:03 PM (IST)

    कोल्हापुरात एसटी बसवर दगडफेक, चालक जखमी

    कोल्हापुरात एसटी बसवर दगडफेक

    संप सुरू असताना एसटी सुरू केल्याने अज्ञातांकडून दगडफेक

    दगडफेकीत एसटी चालक जखमी झाल्याची माहिती

    हातकणंगले तालुक्यातील हलोंडी गावाजवळील घटना

    घटनास्थळी पोलीस दाखल

    मीरजवरून प्रवासी घेऊन कोल्हापूरच्या दिशेने येत होती बस

  • 14 Nov 2021 04:46 PM (IST)

    यवतमाळमध्ये 4 दिवसांपासून सुरू असलेले शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन मागे

    यवतमाळ- 4 दिवसांपासून सुरू असलेले शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन मागे

    वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी डीन डॉ गवारले यांनी लेखी आश्वासन देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे

    रुग्णालयाचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार उघडले

    4 दिवसापासून होते प्रवेशद्वार बंद, फक्त अत्यावश्यक रुग्णासाठी सुरू होते रुग्णालय

  • 14 Nov 2021 04:42 PM (IST)

    आर्णी नगरपरिषदेच्या नगरसेविकेची आत्महत्या, राहत्या घरी केली आत्महत्या

    यवतमाळ - आर्णी नगरपरिषदेच्या नगरसेविकेची आत्महत्या

    राहत्या घरी केली आत्महत्या

    काँग्रेस पक्षाची सुरेखा मेडंके असे आत्महत्या केलेल्या नगरसेविकेचे नाव

    नगरसेविकेच्या आत्महत्येने खळबळ

  • 14 Nov 2021 04:35 PM (IST)

    कर्मवारी काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा 39 वा गळीत हंगाम शुभारंभ थोड्याच वेळेत

    नाशिक :  कर्मवारी काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा 39 वा गळीत हंगाम शुभारंभ थोड्याच वेळेत

    - केंद्रीय माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याहस्ते उसाची मोळी टाकून होणार शुभारंभ

    - पालकमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, निफाडचे आमदार दिलीप बनकर राहणार उपस्थित

  • 14 Nov 2021 01:14 PM (IST)

    भाजप नेते आशिष शेलार आझाद मैदानात

    भाजप नेते आशिष शेलार आझाद मैदानात दाखल

    ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांची लढाई नाही, ही लढाई समाजाला न्याय देण्याची

    ठाकरे सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे

    कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवायला एवढा वेळ लागतोच कसा

  • 14 Nov 2021 10:35 AM (IST)

    नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    25 जागांसाठी साठी 4615 उमेदवार

    शहरातील 11 केंद्रावर होत आहे परीक्षा

    परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील एंट्री पॉइंट ला पोलिसांचे मार्गदर्शन केंद्र

    परीक्षेसाठी पाचशे पोलीस कर्मचारी आणि 60 अधिकारी तैनात

    कडक तपासणी करून परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांमध्ये दिला जात आहे प्रवेश

  • 14 Nov 2021 09:15 AM (IST)

    कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात वारकरी दाखल व्हायला सुरुवात

    कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात वारकरी दाखल व्हायला सुरुवात,

    दोन वर्षानंतर पंढरपूरात भरतीये कार्तिकी एकादशी,

    आजच पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल,

    पंढरपूरात उत्साहाचं चैतन्याचं वातावरण,

    उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शासकीय पुजेसाठी राहणार उपस्थित,

    पंढरपूरात जमली वैष्णवांची मांदियाळी

  • 14 Nov 2021 08:47 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक घटली

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक घटली

    गेल्या 24 तासात फक्त जिल्ह्यात 50 रुग्ण पॉझिटिव्ह

    तर मृत्यू संख्या आली आटोक्यात

    ग्रामीण भागात वाढत्या रुग्ण संख्यने आरोग्य विभागावर पडला होता ताण

    मात्र नागरिकांना नियम पाळण्याच प्रशासनाकडून आवाहन

  • 14 Nov 2021 08:46 AM (IST)

    अंदमान आणि थायलंडच्या किनाऱ्यावरजवळ कमी दाबाच क्षेत्र तयार

    अंदमान आणि थायलंडच्या किनाऱ्यावरजवळ कमी दाबाच क्षेत्र तयार

    कमी दाबाच्या पट्टयांच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता

    पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता

    18 नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

    17 नोव्हेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

    पुणे हवामान वेधशाळेने वर्तवला अंदाज

  • 14 Nov 2021 08:45 AM (IST)

    नाशिक पोलीस अकादमीत पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव

    नाशिक पोलीस अकादमीत पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव

    नाशिक पोलीस अकादमीत 22 प्रशिक्षणार्थी कोरोनाबधित

    प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांपैकी 22 भावी उपनिरीक्षक पॉझिटिव्ह

    बधितांवर नाशिकच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरु

    दिवाळी साजरी करून परतलेल्या प्रशिक्षणार्थींची केली होती चाचणी

    887 पैकी 22 जणांना कोरोना लग्न झाल्याच आलं समोर

    इतर प्रशिक्षणार्थींना काळजी घेण्याच्या सूचना

  • 14 Nov 2021 08:41 AM (IST)

    कोल्हापुराच्या पाडळी गावातील पूरग्रस्तांचा पूरबाधित अनुदानावर सामुदायिक बहिष्कार

    कोल्हापूर

    कोल्हापुराच्या पाडळी गावातील पूरग्रस्तांचा पूरबाधित अनुदानावर सामुदायिक बहिष्कार

    पूर बाधित ऊस क्षेत्रासाठी देण्यात येतय प्रतिगुंठा 135 रुपये अनुदान

    2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी

    नाकारलेल अनुदान परस्पर खात्यावर जमा केल्यास रक्कम पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचा ग्रामस्थांचा इशारा

    गावातील राजर्षी शाहू सेवा संस्थेच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी घेतला आक्रमक पवित्रा

  • 14 Nov 2021 08:40 AM (IST)

    नागपूर महापालिकेचे कर वसुलीचे अभियान जोरात

    नागपूर -

    महापालिकेचे कर वसुलीचे अभियान जोरात

    दररोज 1.78 कोटी वसुली चे उद्दीष्ठ

    100 टक्के कर वसुली साठी करण्यात आले नियोजन

    651. 75 कोटी ची जुनी थकबाकी वसूल करण्याच मोठं आवाहन

    झोन निहाय कर वसुली चे उद्दीष्ठ

    यावर्षात आता पर्यंत झाली 96 कोटी ची कर वसुली

    मात्र अजून मोठं उद्दिष्ट गाठण्याच प्रशासन समोर आवाहन

  • 14 Nov 2021 07:20 AM (IST)

    सातारा-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे मंगळवारपासून सुरु होणार

    कोल्हापूर

    सातारा-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे मंगळवारपासून सुरु होणार

    कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होती या मार्गावरील रेल्वे सेवा

    कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे पॅसेंजर सुरू करण्याची प्रवाशांमधून होती मागणी

    प्रवासी नोकरदार यांचा सातारा कोल्हापूर पॅसेंजर ला असतो सर्वाधिक प्रतिसाद

    तर मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर ही उद्यापासून सुरू होणार

    लांब पल्ल्या नंतर आता पॅसेंजर रेल्वे ही सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान

  • 14 Nov 2021 07:19 AM (IST)

    पुण्यातील हडपसरमध्ये साडेसतरा नळी इथं एका गोडाऊनला भीषण आग

    पुणे

    पुण्यातील हडपसरमध्ये साडेसतरा नळी इथं एका गोडाऊनला लागली होती भीषण आग,

    आगीचं कारण अस्पष्ट,

    अग्निशमन दलाच्या जवानांंनी आग आणली आटोक्यात,

    आगीत कोणतीही जिवीतहानी नाही,

    पुण्यात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ

  • 14 Nov 2021 07:05 AM (IST)

    सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

    सोलापूर -

    सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

    बस सेवा पूर्णपणे ठप्प

    खासगी वाहतुकीला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी

    आता खासगी वाहतुकीकडे सुद्धा प्रवाश्यानी फिरवली पाठ

  • 14 Nov 2021 07:03 AM (IST)

    कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

    कोल्हापूर

    कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू

    कोल्हापूरातील एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

    अनिल मारुती कांबळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव

    2015 साली कामावर रुजू झाले होते

    गारगोटी जवळील मडीलगे खुर्द गावचे रहिवासी

    सध्या सावंतवाडी आगार चालक कम वाहक म्हणून काम करत होते

    संप असल्याने ते मडीलगे येथे राहायला होते.

    गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

  • 14 Nov 2021 07:02 AM (IST)

    काँग्रेसचे आजपासून शहरात जनजागरण, महागाई विरोधात उठविणार आवाज

    नागपूर -

    काँग्रेसचे आजपासून शहरात जनजागरण

    महागाई विरोधात उठविणार आवाज

    सकाळी 10 वाजता देवडिया काँग्रेस भवन मधून करणार अभियानाची सुरवात

    काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार जनजागरण अभियानाला सुरवात

    माजी केंद्रीय मंत्री तारीक अनवर सुद्धा राहणार उपस्थित

  • 14 Nov 2021 06:51 AM (IST)

    "गडचिरोलीतील कारवाईनंतर पोलिसांचं कौतुक करावं तितकं थोडं!" - जयंत पाटील

    "कुठल्याही हिंसाचाराचा निषेधच करायला हवा!"
    अमरावती हिंसाचारावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
    "गडचिरोलीतील कारवाईनंतर पोलिसांचं कौतुक करावं तितकं थोडं!"
    जयंत पाटील यांच्याकडून महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक
  • 14 Nov 2021 06:50 AM (IST)

    26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, एकनाथ शिंदेंकडून गडचिरोली पोलिसांचं कौतुक

    26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या गडचिरोली पोलीस आणि सी 60 जवानांचं मनापासून अभिनंदन

    एकनाथ शिंदे यांनी ट्विटकरून केले अभिनंद

Published On - Nov 14,2021 6:32 AM

Follow us
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.