मुंबई : आज सोमवार एक फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील या दोन्ही पक्षांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांमुळे (Elections) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हुडहुडी काही प्रमाणात कमी झाली आहे. असेच आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या बातम्यांसह आपण सर्व घडामोडी येथे पाहणार आहोत.
जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप-
प्रशांत जगताप यांच वक्तव्य हास्यास्पद आहे
ज्या पक्षाचे महापालिकेत 40-45 नगरसेवक आहेत, त्यापक्षाचे शहराध्यक्ष हास्यास्पद वलग्ना करतायेत.
जगतापांनी त्यांच्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांना थांबून दाखवावं
आम्ही राष्ट्रवादीला खिंडार पाडल्याशिवाय राहणार नाही
प्रसिद्धीत राहण्यासाठी जगताप अशी वक्तव्य करतात
प्रसिध्दीत राहून सत्ता मिळवता येत नाही
पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्य प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असाही दावा जगताप यांनी केला आहे. तसेच या नगरसेवकांची प्रशांत जगताप यांच्याशी बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे.
दोन पर्याय आहेत, उच्च न्यायालयात जाऊ शकतो किंवा जर आम्हाला सरेंडर करायचे असेल तर ते करु शकतो मॅजिस्ट्रेट समोर…पण आजच्या घडीला आमचा निर्णय हा आहे की आम्ही उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाचा निकाल चॅलेंज करणार आहोत. आज संध्याकाळ अर्ज करू कारण आता आम्हाला सत्र न्यायालयाच्या निकालाची ऑर्डर कॉपी मिळाली आहे.
जामिनासाठी केला अर्ज
सिंधुदूर्ग न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
राणेंच्या याचिकेवर कधी सुनावणी हे उद्या स्पष्ट होईल
नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला
नितेश राणेंची चौथ्यांदा निराशा
हायकोर्टात दिलासा मिळणार?
जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाबाहेर राडा
मुंबई – अनिल परब दापोली रिसाॅर्ट प्रकरणी मोठी घडीमोड
– अनिल परब यांच्या दापोलीच्या रिसाॅर्टबाबत महत्वाचा निर्णय झाल्याची मंत्रालयाच्या सूत्रांची माहीती
– दापोली इथे परिवहन मंत्री अनिल परब यांचा रिसाॅर्ट आहे
– या रिसाॅर्टवर तोडक कारवाईचे आदेश निघणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहीती…
सातारा : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
सकाळी 9.47 ला जाणवला 3.3 रेकटर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का
भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किलोमिटर तर काडोली गावाच्या पश्चिमेला 7 किमी अंतरावर भूकंपाचा धक्का
मुंबई : आज मुंबईत शिक्षणमंत्री आणि माध्यमिक बोर्डाच्या अध्यक्षांची बैठक
बैठकीत परीक्षेसंदर्भात होणार चर्चा
परीक्षा ऑनलाईन घेणं शक्य नाही 30 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं अशक्य आहे
बोर्डाच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि बोर्ड अध्यक्ष शरद गोसावी यांच्यामध्ये होणार चर्चा
ऑफलाईन परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण, ऑनलाईन शक्य नाही, बोर्ड अध्यक्षांचं स्पष्टीकरण
कोल्हापूर : विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक
कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथील घटना, काल संध्याकाळची घटना
अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग विझवली
आगीमध्ये सहा ते सात लाखाच्या दुचाकींचे नुकसान
गोवा- गोवा निवडणुकीसाठी 301 उमेदवार रिंगणात
गोव्यात 40 जागांवर 14 फेब्रुवारी रोजी होणार मतदान
गोवा राज्यातील शिवोली मतदार संघात सर्वाधिक 13
तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सांखळीत मतदार संघातून 12 उमेदवार रिंगणात
31 उमेदवारांची निवडणुकीतून माघार
पणजी मतदार संघात 7 उमेदवार रिंगणात
पुणे : राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंचं मिशन पुणे महापालिका
6 आणि 7 फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे करणार पुणे दौरा
पदाधिकाऱ्याऱ्यांच्या विकासकामांचा करणार शुभारंभ
महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून शिवसेनेची मोर्चेबांधणी
आदित्य ठाकरे घेणार पक्षाची पदाधिकारी बैठक
टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती
बुलडाणा : जिल्ह्यातील 9 अवैध बायोडिझेल पंप चालकांना नोटीस
जिल्हा पुरवठा अधिकारी विभागाची कारवाई
मलकापूर तालुक्यात सुरुय मोठ्या प्रमाणात अवैध आणि भेसळयुक्त डिझेल पंप
बायोडिझेल पंपाला जिल्हा प्रशासनाने कोणततीही परवानगी दिली नसताना सुरु आहे विक्री
कारवाईसाठी पुरवठा विभागाने कसली कंबर
हिंदुस्तानी भाऊल अटक
बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता
मुंबई – हिंदूस्तानी भाऊला आज सकाळी नायर रुग्णालयात मेडीकलसाठी नेल्याची माहीती
– 10नंतर बांद्रा कोर्टात हजर करणार असल्याची माहीती…
– कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस ठाण्याबाहेर वाढणार बंदोबस्त…
– मेडीकल करून पुन्हा धारावी पोलीस ठाण्यात आणणार..
– कोणतीही अधिकृत माहीती देण्यास पोलिसांचा नकार…
पुणे – पुण्यातील मनसे पदाधिकारी भाजपसोबत युतीसाठी आग्रही
– पुण्यातील युतीबाबत मुंबईतील बैठकीत होणार निर्णय
– तीनचा प्रभाग असल्यामुळे भाजपसोबत युती करावी मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका
– भाजपसोबत युती केल्यास मनसेच्या संख्याबळ वाढणार
– पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडले राज ठाकरेंसमोर युतीचे गणित