Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,598 रुग्णांची भर, आकडा 59,546 वर

राज्यात आज दिवसभरात तब्बल 2 हजार 598 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59 हजार 546 वर पोहोचली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,598 रुग्णांची भर, आकडा 59,546 वर

मुंबई : राज्यात आज दिवसभरात तब्बल 2 हजार 598 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59 हजार 546 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 85 कोरोना (Maharashtra Corona Cases) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 1 हजार 982 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात (Maharashtra Corona Cases) आला आहे.

राज्यात आतापर्यंत 18 हजार 616 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 38 हजार 939 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज 85 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 1982 इतकी झाली आहे.

आज झालेल्या 85 मृत्यूपैकी 37 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर इतर मृत्यू हे 15 ते 25 मे दरम्यानचे आहेत. यापैकी मुंबईचे 22, सोलापूरचे 5, अकोल्याचे 4, औरंगाबादचे 3, साताऱ्यातील 3, ठाण्यातील 3, वसई-विरारमधील 3, जळगावातील 1, नांदेडमधील 1, नवी मुंबईतील 1, पुण्यातील 1 आणि रायगडमधील एकाचा समावेश आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजारांच्या पार

मुंबईत दिवसभरात 1467 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही 35 हजार 485 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1135 वर पोहोचली आहे (Maharashtra Corona Cases).

पुण्यात 5 हजार 851 कोरोनाबाधित

दिवसभरात पुण्यात 318 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 5 हजार 851 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 205 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुण्यात 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 293 झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई114284870746353
पुणे (शहर+ग्रामीण)89231373112099
ठाणे (शहर+ग्रामीण)93342588362585
पालघर 156199323327
रायगड1653810858373
रत्नागिरी170092662
सिंधुदुर्ग3682717
सातारा38722169138
सांगली234594063
नाशिक (शहर +ग्रामीण)147508931462
अहमदनगर (शहर+ग्रामीण)4740276061
धुळे30611943101
जळगाव 108267385518
नंदूरबार 62941431
सोलापूर91294615504
कोल्हापूर 50601590105
औरंगाबाद138968250482
जालना1940143474
हिंगोली 55042512
परभणी64333324
लातूर 2067102089
उस्मानाबाद 97151845
बीड75726920
नांदेड 169574675
अकोला 25931951115
अमरावती 2034137060
यवतमाळ 94350827
बुलडाणा 128368539
वाशिम 59136112
नागपूर4835193073
वर्धा 1961024
भंडारा2451942
गोंदिया 2882303
चंद्रपूर4302610
गडचिरोली2692251
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)398048
एकूण42211825612814994

Maharashtra Corona Cases

संबंधित बातम्या :

Kolhapur Corona | कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?

आधी शिवसेना खासदाराकडून घर, आता राष्ट्रवादीच्या आमदाराकडून दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी जाहीर

Kolhapur Corona | कोल्हापुरातील डोंगराळ आणि गवताळ शाहूवाडी तालुक्यात कोरोना कसा पोहोचला?

Shirdi Corona | भाजी विक्रेत्या महिलेला कोरोना, संपूर्ण गाव होम क्वारंटाईन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *