Maharashtra Corona Update | दिवसभरात सर्वाधिक 8,139 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 600 वर

राज्यात आज दिवसभरात 4 हजार 360 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Maharashtra Corona Update | दिवसभरात सर्वाधिक 8,139 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 600 वर

मुंबई : राज्यात आज (11 जुलै) दिवसभरात सर्वाधिक 8 हजार 139 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Total Cases). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 600 वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, तरीदेखील कोरोनाबाधितांचा वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Total Cases).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दिवसभरात 4 हजार 360 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज दिवसभरात 4 हजार 360 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.55 टक्क्यांवर पोहोचलं आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 36 हजार 985 रुग्ण बरे झाले आहेत. तर 99 हजार 202 रुग्णांवर उपचार सरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात 223 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 223 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात सध्या मृत्यूदर 4.1 टक्के एवढा आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 1 हजार 116 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात 6 लाख 80 हजार 017 जण होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात सध्या 6 लाख 80 हजार 017 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 47 हजार 376 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत (Maharashtra Corona Total Cases).

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई123382965866499
पुणे (शहर+ग्रामीण)113004699302728
ठाणे (शहर+ग्रामीण)104935810953008
पालघर 1840812179424
रायगड2014315658510
रत्नागिरी2119140578
सिंधुदुर्ग4893469
सातारा56793482172
सांगली46871986124
नाशिक (शहर +ग्रामीण)2059712621569
अहमदनगर (शहर+ग्रामीण)9111492897
धुळे40632541127
जळगाव 144389767611
नंदूरबार 92351543
सोलापूर117126841580
कोल्हापूर 88853347218
औरंगाबाद1629810660545
जालना2460161886
हिंगोली 78654617
परभणी102846039
लातूर 36381535146
उस्मानाबाद 224985862
बीड167155531
नांदेड 30811083107
अकोला 29812447129
अमरावती 2809193082
यवतमाळ 146696044
बुलडाणा 1900109052
वाशिम 93056118
नागपूर85852756230
वर्धा 2801779
भंडारा3722432
गोंदिया 5443144
चंद्रपूर7353821
गडचिरोली4203082
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)524054
एकूण51533235171017757

संबंधित बातम्या :

धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *